शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बोहल्यावर चढल्यानंतर बजावला मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:44 IST

लोकशाहीचा उत्सव आणि संसाराची सुरुवात हा योगायोग आल्याने लग्नानंतर संसाराला सुरुवात करण्याआधी गावातील देवदेवतांचे दर्शन घेण्याबरोबरच लोकशाहीच्या दरबारात नवदाम्पत्यांनी हजेरी लावली.

ठळक मुद्देयोगायोग : लोकशाहीचा उत्सव आणि संसाराची सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क ।बीड : लोकशाहीचा उत्सव आणि संसाराची सुरुवात हा योगायोग आल्याने लग्नानंतर संसाराला सुरुवात करण्याआधी गावातील देवदेवतांचे दर्शन घेण्याबरोबरच लोकशाहीच्या दरबारात नवदाम्पत्यांनी हजेरी लावली. नातेवाईक अन् ग्रामस्थांनी मतदान केंद्रापर्यंत त्यांची अतिशय उत्साहात वरात काढली.परळी तालुक्यातील खोडवा सावरगाव येथील धनराज यशवंत दहीफळे यांचा शुभविवाह गुरु वारी मतदानाच्या दिवशी धर्मापुरी येथील जिजा महादेव फड यांच्यासमवेत झाला. धर्मापुरीत शुभविवाह झाल्यानंतर वधूसह नवरदेव खोडवा सावरगाव येथे आले. त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत नातेवाईक ही होते अशी माहिती तलाठी अमोल सवाईशाम यांनी दिली.आष्टी तालुक्यातील टाकळी आमिया येथे लोकसभेचे मतदान असल्याने वधू - वरास मतदानाला जाताना हलगी वाजून नेण्यात आले. सोबत सामाजिक कार्यकर्ते अशोक चौधरी.गोमळवाडा येथील मारुती भागवत भुंबे या युवकाचा १७ एप्रिल रोजी गावातील श्रद्धा या मुलीशी विवाह सम्पन्न झाला. रीतीरिवाजाप्रमाणे दुसऱ्या दिवशी देवदर्शन घेण्यासाठी जायचे असते. परंतु या वधूवराने आधी मतदानाचा हक्क बजावला व नंतर देवदर्शनासाठी निघून गेले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbeed-pcबीडMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Votingमतदान