शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक अनुषंगाने एसपींची आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:36 IST

येणाऱ्या विधासभेच्या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची सोमवारी कार्यालयात बैठक घेतली व सूचना केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सण - उत्सव शांतते पार पडल्यानंतर सर्वांनाच विधासभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. पोलीस प्रशासनाने केलेल्या योग्य नियोजनामुळे गणेशोत्सव तसेच इतर सण शांततामय वातावरणात पार पडले. येणाऱ्या विधासभेच्या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची सोमवारी कार्यालयात बैठक घेतली व सूचना केल्या.या बैठकीला बीडचे अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अंबाजोगाई विभगाच्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर व इतर सर्व पोलीस उपाधीक्षक व इतर अधिका-याची उपस्थिती होती. दरम्यान यावेळी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी केलेल्या नियोजनाचा आढावा घेतला. त्यानंतर विधानसभानिवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याविषयी अधिका-यांना सूचना केल्या. दरम्यान विविध गुन्ह्यातील फरार आरोपींना पकडणे, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक कारवाया करणे, अवैध धंदेवाल्यांना चाप लावणे, एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाया करुन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करणे. यासह विविध विषयांवर पोद्दार यांनी सूचना केल्या.

टॅग्स :Beed S Pपोलीस अधीक्षक, बीडvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक