शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

मोफत गणवेश पुरवठ्याची जबाबदारी आता शाळा समितीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 00:47 IST

अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा प्रश्न मिटला असून आता बॅँक खात्याची गरज तसेच पालकांना खरेदी केलेल्या गणवेशाची पावती देण्याची गरज लागणार नाही. विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने गणवेश उपलब्ध होणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे शेकडो पालकांनी सुटकेचा नि:श्वास ...

अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा प्रश्न मिटला असून आता बॅँक खात्याची गरज तसेच पालकांना खरेदी केलेल्या गणवेशाची पावती देण्याची गरज लागणार नाही. विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने गणवेश उपलब्ध होणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे शेकडो पालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असून बीड जिल्ह्यातील १ लाख १५ हजार ८७२ विद्यार्थ्यांना या गणवेश योजनेचा लाभ मिळणार आहे.

सर्व शिक्षा आता समग्र शिक्षा अभियान म्हणून परिवर्तित झाले आहे. या अभियानांतर्गत मोफत गणवेश योजना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी लागू आहे. इयत्ता पहिली ते आठवीत शिक्षण घेणाऱ्या सर्व मुली, अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीमधील मुले, तसेच दारिद्रय रेषेखालील पालकांची मुले या योजनेतील लाभार्थी आहेत.

यावर्षी मोफत गणवेश योजनेचा निधी शाळा व्यवस्थापन समितीकडे गणवेश खरेदीसाठी वर्ग होणार आहे. इयत्ता पहिलीच्या लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी व शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या निकषपात्र विद्यार्थ्यांना तत्काळ गणवेशाचे वाटप करण्याबाबत शासनपातळीवर सूचना दिल्या आहेत. गणवेशाचे अनुदान वितरण करताना विलंब टाळण्यासाठी जिल्हा स्तरावरुन थेट शाळा व्यवस्थापन समितीकडे अनुदान वितरित होणार आहे.शाळा समित्यांना बंधनेगणवेश खरेदी बिलांची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीने संबंधित पुरवठादारास धनादेशाद्वारेच द्यायची असून रोख पेमेंट करुन नये. तसेच पुरवठादाराला दिलेल्या रकमेचे अभिलेखे, धनादेशाची झेरॉक्स प्रत, गणेवश वाटप केल्याची नोंद, दिनांक, विद्यार्थी व पालकांची स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा स्टॉक रजिस्टरमध्ये नोंदवावा.

निर्णय स्तुत्य, जि.प.च्या सर्वच मुलांना देऊ गणवेशबँकेत खाते काढण्याच्या निर्णयामुळे मागील वर्षी २० टक्के विद्यार्थीसुध्दा गणवेश घेऊ शकले नाहीत. किंमत कमी आणि बँकेत खाते काढणे त्यांना परवडत नव्हते. त्यामुळे अनेकदा पाठपुरावा केला. यावर्षीचा निर्णय स्तुत्य आहे. मोफत गणवेश योजनेमध्ये जिल्हा परिषद शाळांमधील खुल्या प्रवर्गातील मुलांना गणवेश मिळत नाही. त्यामुळे स्वयंसेवी संस्था, शिक्षणप्रेमी, दानशुरांच्या मदतीने खुल्या प्रवर्गातील मुलांनाही गणवेश उपलब्ध करुन देण्याचे आमचे नियोजन आहे. गाव पातळीवर लोकसहभाग मिळावा म्हणून प्रयत्न होतील. जेथे कमी पडेल तेथे सभापती या नात्याने जबाबदारी घेणार असून, संपूर्ण विद्यार्थ्यांना गणवेश देणार आहोत.

- राजेसाहेब देशमुख, शिक्षण सभापती, जि. प. बीड

दोन गणवेश मिळणारएका विद्यार्थ्याला दोन गणवेश संचासाठी ६०० रुपये तरतूद करण्यात आली आहे. मात्र जीएसटीमुळे पुन्हा अडचण होणार आहे. जीएसटीच्या नावावर काही ठिकाणी समित्यांकडून हलक्या दर्जाचे गणवेश खरेदी केले जाऊ शकतात. चांगल्या दर्जाचे गणवेश मिळावे म्हणून सामुहिक प्रयत्नांची गरज आहे.

पालकांची कटकट संपलीगतवर्षी शासनाच्या आदेशानुसार गणेवशासाठी विद्यार्थ्यांना बॅँकेत खाते उघडावे लागले. त्यात एक हजार रुपये ठेवणे आवश्यक होते. गणवेशासाठी ४०० रुपये मिळत होते. त्यामुळे असंख्य पालकांनी खाते न उघडता स्वत:च पाल्यांसाठी गणवेश खरेदी केले होते. आता मात्र ही कटकट संपली आहे.