शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : शेतकरीविरोधी कायदे रद्द करा, या मागणीसाठी रविवारी रात्री अंबाजोगाईत मशाल रॅली काढण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : शेतकरीविरोधी कायदे रद्द करा, या मागणीसाठी रविवारी रात्री अंबाजोगाईत मशाल रॅली काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

भाजपच्या अडेलतट्टू आणि निष्ठूर केंद्र सरकारविरोधात लाखो शेतकरी आंदोलनात रस्त्यावर उतरले. पण सरकार अजूनही बधले नाही, हे पाहून संयुक्त किसान मोर्चाने १० फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत तिन्ही कृषी कायदे व वीज विधेयक रद्द करा आणि रास्त हमीभाव देणारा कायदा संमत करा, या मागण्यांकरिता देशभर आंदोलन तीव्र करणाऱ्या अनेक कृती जाहीर केल्या आहेत.

गेल्या ८० दिवसांपासून अखंड सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात दिल्लीच्या विविध सीमांवर आजवर २२८ शेतकरी शहीद झाले आहेत. रविवारी अंबाजोगाईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मशाल रॅली काढून शहिदांना आदरांजली व शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. या आंदोलनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे बब्रुवान पोटभरे, किसान सभेचे मुरलीधर नागरगोजे, डी. वाय. एफ. आय.चे अजय बुरांडे, प्रा. सुभाष धुळे, प्रशांत मस्के, सुहास चंदनशीव, देविदास जाधव, महेश देशमुख, खय्युम शेख, भागवत जाधव, महेश देशमुख, ऊत्रेश्वर इंगोले, विशाल देशमुख यांच्यासह शेकडो शेतकरी, विद्यार्थी, युवक सहभागी झाले होते.

संयुक्त किसान मोर्चाने जाहीर केलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून १४ फेब्रुवारी या पुलवामा घटनेच्या दिवशी शहीद झालेल्या सैनिकांना आणि शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या त्यागाला अभिवादन करण्यासाठी मेणबत्ती मोर्चे, मशाल मार्च आणि अन्य कार्यक्रम देशभर आयोजित केले होते. याच अनुषंगाने अंबाजोगाईतही रविवारी मशाल रॅली काढण्यात आली.