शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

स्थलांतरित मजुरांना एलपीजी कनेक्शनसाठी दिलासा - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:38 IST

आष्टी : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील महोबा येथे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एलपीजी कनेक्शन सोपवून उज्ज्वला योजनेचा दुसरा ...

आष्टी : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील महोबा येथे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एलपीजी कनेक्शन सोपवून उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना एलपीजी कनेक्शन केवळ मोफतच मिळणार नाही, तर त्यांना पहिले रिफिल आणि शेगडीही मोफत मिळणार आहे. या योजनेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे नेते माजी आ. भीमसेन धोंडे यांनी केले आहे.

स्थलांतरितांना रेशनकार्ड किंवा कोणताही रहिवासी पुरावा सादर करण्याची आवश्यकता असणार नाही. यासाठी स्वत:चे घोषणापत्र पुरेसे मानले जाईल. उज्ज्वला २.० योजनेमध्ये पंतप्रधान उज्ज्वला दुसऱ्या भागात अशा स्थलांतरित मजुरांसाठी विशेष तरतूद केली आहे. जे यापूर्वी रहिवासी प्रमाणपत्राअभावी या योजनेपासून वंचित होते. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात आता स्थलांतरित मजुरांना एलपीजी कनेक्शन मिळण्यासाठी दिलासा देण्यात आला आहे. बीपीएल कार्डधारक कोणतीही महिला उज्ज्वला योजनेचा लाभ घेऊ शकते. जवळच्या एलपीजी सेंटरमध्ये अर्ज, केवायसी फॉर्म भरावा लागेल. अर्ज भरण्यासाठी नाव, पत्ता, जन धन बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक आदी आवश्यक कागदपत्रे आहेत, असे धोंडे म्हणाले.

पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या वेबसाइटवरून आपण पीएमयूवायचा अर्ज डाउनलोड करू शकता. सवलतीच्या दरात स्वयंपाकाचा एलपीजी गॅस देणारी योजना दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील महिलेच्या नावे लाभ मिळतो. सरकार १६०० रूपये अनुदान देते, तर तेल कंपन्या १६०० रुपये ग्राहकांना कर्जस्वरूपात देतात. १४.२ किलोचे पहिले सहा सिलिंडर ईएमआय फ्री असून सातव्या सिलिंडरपासून ईएमआयची सुरुवात होईल. अर्जदाराकडे बीपीएल रेशनकार्ड असणे आवश्यक आहे. आधारकार्ड किंवा मतदार ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्डची प्रत, राष्ट्रीय बँकेत बचत खाते असणे बंधनकारक आहे, असेही या योजनेबाबत माहिती देताना धोंडे म्हणाले.