शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा निर्मितीसाठी अंबाजोगाईत निघाली रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:31 IST

अंबाजोगाई : बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा निर्मिती करावी, या मागणीसाठी अंबाजोगाईतील सर्व पक्ष व संघटना बुधवारी सकाळी एकत्र आल्या होत्या. रॅलीतून जिल्हा निर्मितीच्या घोषणा देत उपजिल्हाधिका-यांना दोन हजार नागरिकांच्या स्वाक्ष-यांचे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देपक्ष, संघटना एकवटल्या : दोन हजार स्वाक्ष-यांचे दिले निवेदन

अंबाजोगाई : बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा निर्मिती करावी, या मागणीसाठी अंबाजोगाईतील सर्व पक्ष व संघटना बुधवारी सकाळी एकत्र आल्या होत्या. रॅलीतून जिल्हा निर्मितीच्या घोषणा देत उपजिल्हाधिका-यांना दोन हजार नागरिकांच्या स्वाक्ष-यांचे निवेदन देण्यात आले.

अंबाजोगाई जिल्हा व्हावा, ही येथील नागरिकांची जुनीच मागणी आहे. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी सर्व पक्ष व संघटनांनी एकत्रित येऊन अंबाजोगाई जिल्हानिर्मिती कृती समितीच्या माध्यमातून बुधवारी उपजिल्हाधिकारी यांना दोन हजार नागरिकांच्या स्वाक्ष-यांचे निवेदन दिले. सकाळी १० वाजता नगर परिषद कार्यालयापासून शहरवासियांची रॅली बसस्थानक, सावरकर चौक, शिवाजीचौक मार्गे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. द्वारकादास लोहिया यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

जिल्हा निर्मितीसाठी सर्व पूरक कार्यालय अंबाजोगाईत उपलब्ध आहेत. सर्व अनुकूलता उपलब्ध असल्याने तात्काळ अंबाजोगाई जिल्हा जाहीर करावा, तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड, उमाकांत दांगट यांनी जिल्हा निर्मितीचा अहवाल प्रशासनाकडे पाठविलेला आहे. या अहवालाचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी शहरातील सर्व पक्ष संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनेउपस्थित होते.मुख्यमंत्र्यांना भेटणारअंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी जिल्हा निर्मितीचे शिष्टमंडळ नारायणगड येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी भेट घेणार आहे. आ. विनायक मेटे यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी मध्यस्थी केली आहे. आता यासंदर्भात शिष्टमंडळ चर्चा करणार आहे.