यावेळी डॉ.राठी म्हणाले की, जीवनामध्ये संकटे येत असतात, त्याला समर्थपणे सामोरे जाणे, यातच खरा पुरुषार्थ आहे. ही विवेकानंदांची शिकवण सर्वांनी आचरणात आणल्यास संकटांना सामोरे जाणे सहज शक्य आहे. राजमाता जिजाऊ यांनी दुसऱ्याच्या दरबारी गुलामी करण्यापेक्षा आपले स्वतःचे राज्य निर्माण केले. या शिकवणीतूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. आजच्या युवकांनी हा आदर्श समोर ठेवून स्वतःचे उद्योग व्यवसाय काढून इतरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीयसेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.नवनाथ विधाते यांनी केले, तर आभार प्रा.नरेंद्र गवळी यांनी व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयचे सर्व विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गांधी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:28 IST