शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

पीक विमा मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:38 IST

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा २०२० चा खरीप पीक विमा देण्यास कंपनीस भाग पाडावे व हा ...

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा २०२० चा खरीप पीक विमा देण्यास कंपनीस भाग पाडावे व हा प्रश्न विधिमंडळात मांडावा, या मागणीचे निवेदन आ. नमिता मुंदडा यांना अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळाने दिले.

२०२० च्या खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या सर्व पिकांसाठी विक्रमी विमा संरक्षण घेतले होते. यावेळी हंगामाअखेरीस सातत्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही शेतकऱ्यांना अद्याप विमा कंपनीने नुकसानभरपाई दिलेली नाही. विमा कंपनीने विमा प्रावधानातील पळवाटा पुढे करून, अव्यवहार्य सबबीआड शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपासून वंचित ठेवणे न्यायोचित नाही. त्यामुळे २०२० च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्व पीक नुकसानीचे शासनाच्या महसूल विभागाने केलेले पीक पंचनामे गृहीत धरून बीड जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही अटी, शर्तींशिवाय सरसकट पीक विमा द्यावा, प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना जाचक ठरणाऱ्या अव्यवहार्य अटी शर्तींचा फेरविचार करावा, यासाठी आम्ही रस्त्यावर ही लढाई लढून दायित्व निभावतो आहोत, तर लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत हा प्रश्न ऐरणीवर आणून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, या मागणीचे निवेदन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने केज विधानसभेच्या आ. नमिता मुंदडा यांना देण्यात आले. या शिष्टमंडळात कॉ. घाडगे पी.एस., कॉ. नागरगोजे मुरलीधर, कॉ. दत्ता डाके, कॉ. पाडुरंग राठोड, कॉ. अजय बुरांडे, कॉ. शेख खयुम यांचा समावेश होता.

-----

अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनदेखील पीक विमाधारक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहत आहेत. शासन मात्र बीड जिल्हा पीक विमा पॅटर्न शेतकरी हिताचा असल्याचे सांगून तो राज्य व राष्ट्रव्यापी व्हावा, अशी शिफारश करत असेल, तर विधानमंडळाच्या पटलावर याची समीक्षा होऊन हे धोरण खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हिताचेच आहे. हे जिल्ह्यातील उर्वरित सर्व नुकसानग्रस्त शेतकन्यांना पीक विमा वाटप करून सिद्ध करावे, तरच राज्यातील इतर शेतकऱ्यांना ही योजना विश्वासार्ह वाटू लागेल, असे किसान सभेने निवेदनात म्हटले आहे.

120821\img-20210812-wa0081.jpg

भारतीय किसान सभेच्या वतीने आ नमिता मुंदडा यांना निवेदन देण्यात आले