शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवा - A - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:34 IST

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा २०२० चा खरीप पीक विमा देण्यास कंपनीस भाग पाडावे व हा प्रश्न ...

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा २०२० चा खरीप पीक विमा देण्यास कंपनीस भाग पाडावे व हा प्रश्न विधिमंडळात मांडावा, या मागणीचे निवेदन आ. नमिता मुंदडा यांना अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळाने दिले. २०२० च्या खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या सर्व पिकांसाठी विक्रमी विमा संरक्षण घेतले होते. यावेळी हंगाम अखेरीस सातत्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही शेतकऱ्यांना अद्याप विमा कंपनीने नुकसानभरपाई दिलेली नाही. विमा कंपनीने विमा प्रावधानातील पळवाटा पुढे करून, अव्यवहार्य सबबी आड शेतकऱ्यांना नुकसानभरपाई पासून वंचित ठेवणे न्यायोचित नाही. त्यामुळे २०२० च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्व पीक नुकसानीचे शासनाच्या महसूल विभागाने केलेले पीक पंचनामे गृहीत धरून बीड जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही अटी, शर्ती शिवाय सरसकट पीक विमा द्यावा, प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना जाचक ठरणाऱ्या अव्यवहार्य अटी शर्तीचा फेरविचार करावा, यासाठी आम्ही रस्त्यावर ही लढाई लढून दायित्व निभावते आहोत, तर लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत हा प्रश्न ऐरणीवर आणून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, या मागणीचे निवेदन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने केज विधानसभेच्या आ. नमिता मुंदडा यांना देण्यात आले. या शिष्टमंडळात कॉ. घाडगे पी. एस., कॉ. नागरगोजे मुरलीधर, कॉ. दत्ता डाके, कॉ. पांडुरंग राठोड, कॉ. अजय बुरांडे, कॉ. शेख खयुम यांचा समावेश होता. अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील पीक विमाधारक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहत आहेत. शासन मात्र बीड जिल्हा पीक विमा पॅटर्न शेतकरी हिताचा असल्याचे सांगून तो राज्य व राष्ट्रव्यापी व्हावा, अशी शिफारशी करत असेल, तर विधान मंडळाच्या पटलावर याची समीक्षा होऊन हे धोरण खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हिताचेच आहे. हे जिल्ह्यातील उर्वरित सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करून सिद्ध करावे, तरच राज्यातील इतर शेतकऱ्यांना ही योजना विश्वासार्ह वाटू लागेल, असे किसान सभेने निवेदनात म्हटले आहे.