बीड : शहराच्या जवळ असलेल्या शिदोड शिवारातील प्रकाश गायकवाड यांच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली तिर्रट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे एपीआय योगेश उबाळे यांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकत १२ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सपोनि योगेश उबाळे यांना शिदोड शिवारात प्रकाश गायकवाड यांच्या शेतात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्याठिकाणी छापा टाकून १२ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये राम श्रीरंग पवार (रा. अयोध्यानगर, बीड), जालिंदर माणिकराव हातागळे (रामतीर्थ बीड), बॉबी ऊर्फ संदेश दीपक गायकवाड (रा. बहिरवाडी बीड), किशोर बबन जाधव (रा.शास्त्रीनगर नाळवंडी नाका बीड), विनोद ग्यानबा भालशंकर (रा. बहिरवाडी बीड), विजय राम रोटके (काळा हनुमान ठाणा, बीड), इकराम खान मुकर्रम खान पठाण (रा. किल्ला मैदान, बीड) आनंद राजेंद्र कांबळे (रा. गांधीनगर, बीड), अरबाज नय्युम पठाण (रा. रामतीर्थ,एमआयडीसी बीड), उत्कर्ष शिवाजी मोमीन (रा.रामतीर्थ, बीड), राहुल राजेंद्र गायकवाड (रा. गांधीनगर बीड), शेख आसेफ शेख नसीर (रा. शाहूनगर, बीड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून रोख रक्कम, मोबाईल व दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सपोनि योगेश उबाळे पोउपनि पवन राजपूत, पो.ना. जाधव, पो.कॉ. डोईफोडे, घटमळ यांनी केली.