शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

अंबाजोगाईत क्लबवर धाड; २७ जुगाऱ्यांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:30 IST

अंबाजोगाई : जिल्हा पोलीस अधीक्षक आ. राजा यांच्या विशेष पथकाने बुधवारी अंबाजोगाई येथे कारखाना रोडवरील एका ...

अंबाजोगाई : जिल्हा पोलीस अधीक्षक आ. राजा यांच्या विशेष पथकाने बुधवारी अंबाजोगाई येथे कारखाना रोडवरील एका पत्त्याच्या क्लबवर छापा मारला. यावेळी त्या ठिकाणी झन्ना-मन्ना जुगार खेळणाऱ्या २७ जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल १८ लाख ५९ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या मोठ्या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

बुधवारी पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने अंबाजोगाईत दाखल झाले होते. यावेळी अंबाजोगाई - साखर कारखाना रोडवर मोरेवाडी शिवारात काही व्यक्ती झन्ना-मन्ना (फेक पत्ता) नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा झाल्यानंतर त्यांनी रात्री साडेनऊ वाजता पथकातील कर्मचाऱ्यांसह या ठिकाणी छापा मारला. यावेळी त्या ठिकाणी तीन गटात २७ व्यक्ती जुगार खेळत आणि खेळवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्या सर्व जुगाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ७ लाख ५७ हजार दोनशे रुपयांच्या रोख रकमेसह ११ दुचाकी, १ चारचाकी, मोबाईल असा एकूण १८ लाख ५९ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी एपीआय विलास हजारे यांच्या फिर्यादीवरून सतीश धोंडीराम चामनर, दत्ता गोविंद साखरे, विशाल पंडितराव चाटे, सय्यद सुलतान सय्यद दस्तगीर, सचिन बालासाहेब गुळभिले, वाहीद बेग खालील बेग, आनंद जगन्नाथ कदम, पुरुषोत्तम संजय कदम, अक्षय विश्वंभर काळे, अमोल दिलीपराव लोमटे, नितीन उर्फ तुळशीराम पांडुरंग यादव, ज्ञानेश्वर उर्फ माऊली पतंगे, नितीन कैलास साठे, राहुल भगवानराव रेणापुरे, सय्यद इलाही पाशा, देविदास काशिनाथ चौगुले, गोविंद राजाभाऊ शेप, एजाज शेख फरहाद, अनिल मुकुंदराव पिसाळ, भैरवनाथ सिद्धराम घोगरे, प्रमोद सिद्धरामअप्पा पोखरकर (सर्व रा. अंबाजोगाई), भगवान विठोबा वैद्य, नितेश मधुकर वैद्य, अहमद इब्राहीम बागवान (रा. घाटनांदूर), नासेरखान शेरखान, निलेश अशोक फड (रा. परळी) आणि राम बली निसार (रा. अलाहबाद, उत्तर प्रदेश) या २७ जुगाऱ्यांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विलास हजारे, पो.ना. राऊत, पो.कॉ. बास्टेवाड, मोरे, इनामदार, कोलमवाड, तौर यांनी पार पाडली. एवढ्या मोठ्या संख्येने जुगारी पकडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.