राज्यातील शालेय पोषण आहार कामगारांचे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. राज्यामध्ये शालेय पोषण आहार कामगारांना ५० रुपये रोज दिला जातो, ५० रुपये रोजप्रमाणे १५०० रुपये महिना पडतो आणि तो पण १० महिने. या १५०० रुपयांमध्ये महिना कसा भागवायचा हा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. इतर राज्यांत तामिळनाडू राज्य ११००० रुपये , केरळ १०८०० रुपये, सिक्कीम ७००० रुपये, हरियाणा ३५०० रुपये, तेलंगणा ३००० रुपये आणि महाराष्ट्रामध्ये १५०० रुपये दिले जातात. कोविड-१९च्या काळामध्ये कामगारांना नियमित १२ महिने मानधन द्या. सेंट्रल किचनप्रणाली रद्द करा, आयकर लागू नसलेल्या कामगारांना ७५०० रुपये महिना द्या, इत्यादीसह अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी माजलगाव मतदारसंघाचे आ. प्रकाश सोळंके यांनी येत्या अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावतो, असे आश्वासन दिले. जिल्हा सचिव कॉ. डॉ. अशोक थोरात, भाग्यश्री साळुंके, कॉ. मीरा शिंदे, कॉ. अशोक पोपळे, विनायक पौळ, कॉ. लता खेपकर, बाबूराव राठोड, विद्या सोळंके, खांडवे, विष्णू गुजर, सारिका सोनटक्के, लता शेजूळ, अजीम बेग, रामभाऊ डाके, इत्यादीसह माजलगाव मतदारसंघातील ६५ शालेय पोषण आहार कामगार उपस्थित होते.
030721\03bed_7_03072021_14.jpg