शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

९ केंद्रांवर ४ लाख ७७ हजार क्विंटल कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 00:21 IST

महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परळी विभागीय कार्यालयाअंतर्गत ९ खरेदी केंद्राच्या २७ जिनींगमध्ये तीन महिन्यांपूर्वी कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपरळी विभागातील केंद्रांवरील स्थिती : राज्यात सर्वाधिक कापूस खरेदी परळी विभागात; २७ जिनिंग, केंद्रांवर खरेदी

संजय खाकरे।लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परळी विभागीय कार्यालयाअंतर्गत ९ खरेदी केंद्राच्या २७ जिनींगमध्ये तीन महिन्यांपूर्वी कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. या केंद्रावर मंगळवारपर्यंत एकूण ४ लाख ७७ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.राज्यात पणन महासंघाचे एकूण ११ विभागीय कार्यालय आहेत. ११ विभागापैकी सर्वाधिक कापूस खरेदी परळी विभागात झाली आहे. पाच वर्षात परळी विभागात कापूस खरेदी समाधानकारक झालीच नव्हती. यावर्षी मात्र राज्यात विक्र म करणारी कापूस खरेदी परळी विभागात झाली आहे. शासकीय कापूस खरेदीचा दर खाजगी खरेदीपेक्षा जास्त असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कल यावर्षी शासकीय कापूस खरेदी केंद्रावरच दिसून येत आहे. कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी कापसाच्या वाहनांची रीघ लागली आहे. परळी विभागात कौडगाव, धर्मापुरी, माजलगाव, मैंदा, साखरे बोरगाव, वडवणी, कुप्पा, भोपा, धारूर, केज, सारूळ, हासेगाव या ९ खरेदी केंद्राचा समावेश आहे. या ९ खरेदी केंद्राअंतर्गत २७ जिनींग असून या जिनींग व कापूस खरेदी केंद्रावर ४,७७,०३६ क्विं. कापुस खरेदी झाली असल्याची माहिती पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक पी.बी.बुकवाल व उपव्यवस्थापक एस.एस.इंगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. कापूस खरेदी केंद्रावर ५३,३५० ते ५,४५० प्रति क्विं. एवढ्या भावाने खरेदी चालू आहे. कापूस केंद्रावर ५ वर्षात प्रथमच विक्रमी कापूस विक्रीसाठी आला यंदा बीड जिल्ह्यात कापसाचे विक्र मी उत्पादन झाले आहे. कापसाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यात पावसानेही साथ दिली, पीक मोेठ्या प्रमाणात आले. कापूस वेचणीसाठी खर्च शेतकऱ्यांस जास्त आला. त्यामुळे कापसाला जादा भाव मिळाला पाहिजे. ८ हजार क्विं. दराने कापूस खरेदी हवी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन संघाचे संचालक राजकिशोर मोदी, उपाध्यक्ष अ‍ॅड.विष्णूपंत सोळंके यांनी केली.

टॅग्स :BeedबीडcottonकापूसAgriculture Sectorशेती क्षेत्र