शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात १४ कोटी रुपयांची तूर खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:20 IST

पुरूषोत्तम करवा माजलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत तुरीची खरेदी करण्यात येत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ...

पुरूषोत्तम करवा

माजलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत तुरीची खरेदी करण्यात येत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणावर तुरीची खरेदी झाली. आतापर्यंत १४ कोटी रुपयांपेक्षा जास्त तूर खरेदी झाली असल्याची माहिती सभापती भारत शेजुळ यांनी दिली. यावर्षी शासकीय भावापेक्षा कमी दराने विक्रीस शेतकऱ्यांनी पसंती दिली.

माजलगाव तालुक्यात कापूस व ऊसानंतर तुरीचा पेरा असतो. यावर्षी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावत चांगला पाऊस पडला होता. या पावसामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. परंतु तुरीचे पीक चांगले आले होते. यामुळे यावेळी तुरीची माजलगावच्या मोंढयात चांगली आवक असून मंगळवारपर्यंत मोंढयात ५७०० ते ५८०० रुपये क्विंटल दराने २५ हजार ६६८ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. याद्वारे शेतकऱ्यांना १४ कोटी ३२ लाख ६२ हजार ७० रुपये मिळाले.

गेल्या वर्षी बाजार समिती अंतर्गत केवळ ६ हजार ६५४ क्विंटल तुरीची खरेदी केवळ ४२०० ते ५१४५ रूपये दराने खरेदी करण्यात आली. त्यावेळी शासकीय भाव हा ५ हजार ८०० रूपये होता. तूर विक्रीतून शेतकऱ्यांना ३ कोटी ३६ लाख ४१ हजार ७७५ मिळाल्याची माहिती सभापती भारत शेजुळ व सचिव हरिभाऊ सवणे यांनी दिली.

शासकीय खरेदी सुरू होणार

यावर्षी अद्याप शासकीय खरेदी केंद्र सुरू न झाल्याने व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट करीत शासकीय भावापेक्षा कमी भावाने तूर खरेदी केली. यावर्षी शासकीय तूर खरेदीचा भाव ६ हजार रुपये भाव आहे. मागील वर्षी ३ हजार १५० क्विंटल तुरीची शासकीय खरेदी करण्यात आली. यातून शेतकऱ्यांना १ कोटी ८२ लाख ७० हजार रुपये मिळाले असल्याची माहिती शासकीय खरीददार अमित नाटकर यांनी दिली. तर येत्या २-३ दिवसांत तुरीची शासकीय खरेदी सुरू करणार असल्याची माहिती नाटकर यांनी दिली.