शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

धारूरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 23:19 IST

धारूर शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी रविवारी रात्रीपासून धुमाकुळ घातला आहे. तब्बल २० जणांना चावा घेतल्याने सर्वत्र या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली असून शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्दे२० जणांना चावा

धारूर : शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी रविवारी रात्रीपासून धुमाकुळ घातला आहे. तब्बल २० जणांना चावा घेतल्याने सर्वत्र या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली असून शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, कुत्र्याने चावा घेतल्यानंतरही बालाजी नाईकवाडे या विद्यार्थ्याने त्याचा पाठलाग करून शिताफीने ठार मारले. धारूर शहरात रविवारी रात्रीपासून पिसाळलेल्या एका कुत्र्याने धुमाकूळ घातला. शहरातील दुधाळा, गायकवाड गल्ली, कसबा, धनगरवाडा या भागात सुमारे २० जणांना या कुत्र्याने चावा घेतला. यामध्ये शाळकरी मुले, मुलींचा समावेश आहे. राम लोखंडे, समीर शेख, जयदीप बेरे, बळीराम राउत, शिवराज औताडे, मुक्ताराम वाणी, अब्दुल कुरेशी, कल्पणा बारस्कर, उस्मान शेख, हर्षा माने, सचिन सिरसळ, आयान शेख, बालाजी नाईकवाडे यांचा जखमीत समावेश आहे.

शहरात धुमाकूळ घातल्यावर हा कुत्रा धनगरवाड्याजवळील डोंगर वेशीजवळ आला. त्याठिकानी बालाजी भिमराव नाईकवाडे या विद्यार्थ्याच्या हाताला चावा घेतला. स्वत:ची सुटका करून घेण्याबरोबरच जवळील लोखंडी रॉडने त्याने कुत्र्यावर हल्ला करीत त्याला ठार केले.दरम्यान, शहरात मागील काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांनी धुमाकुळ घातला आहे. त्यांच्या बंदोबस्तसाठी नगर पालिका आखडता हात घेत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून पालिकेबद्दल संताप व्यक्त होत आहे.