शिरूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तसेच खालापुरी प्राथमिक आरोग्य केद्रांच्या माध्यमातून ० ते ५ वयोगटातील बालकांना डोस देण्यात आले ७,४६८ इतके उद्दिष्ट असले तरी प्रत्यक्षात ८,०७४ बालकांना डोस देऊन उद्दिष्ट पार केले. १०७ टक्के काम झाल्याचे सांगितले गेले.
पाच बूथवर तालुका आरोग्य अधिकारी ,वैद्यकीय अधिकारी यांच्यासह १४३ कर्मचारी, ३० पर्यवेक्षक व मोबाईल पथक सहभागी होते. खालापुरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ सुहास खाडे , डॉ.संजीवनी गव्हाने , डॉ. विशाल मुळे तर शिरूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. किशोर खाडे , डॉ. राहुल सानप यांचा सहभाग महत्त्वपूर्ण होता. पोलीस डोस सर्वव्यापी मोहीम असल्याने या मोहिमेत स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी तसेच बालविकास प्रकल्प कार्यालयातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा देखील महत्वपूर्ण सहभाग राहिला.
पोलिओ डोसपासून कोणतेही बालक वंचित राहू नये याची पुरेपूर काळजी घेतल्याने उद्दिष्ट ओलांडले आहे. याउपर कुणी अनावधानाने चुकून राहिले असल्यास नागरिकांनी त्या बालक, पाल्यांना डोस देण्याचे काम करावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी केले.
८०७४ बालकांना डोस
तालुक्यातील केंद्रांवर बूथवर ० ते ५ वयोगटातील ७७०३ बालकांना, त्यावरील ७१ बालकांना तसेच झोपडपट्टी १७ ,भटक्या जमाती बालक ४३,विटभट्टीवर ४३ ,बांधकामावरील ४७ व इतर स्थलांतरित ७७ आणि जोखीम क्षेत्रातील ७७ बालकांना डोस देण्यात आले. शिवाय मोबाईल टीमने १२७ बालक अशा एकूण ८०७४ बालकांना पोलिओ डोस देण्यात आला.