शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची संरक्षण व्यवस्था अन् आर्थिक परिस्थिती मजबूत राहील; भेंडवळचं भाकीत
2
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मार्चला महायुतीची रॅली
3
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
4
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
5
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
6
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
7
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
8
उडाला भडका, निघाला धूर! अजित पवार गटाचे झिरवाळ, मविआच्या प्रचारसभेला
9
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
10
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!
11
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
12
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
13
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
14
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
15
पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार, ‘इंडिया’ आघाडीचे वादळ येत आहे : राहुल गांधी
16
Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!
17
पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला
18
केजरीवाल जामिनावर मुक्त, निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये करणार प्रचार
19
सेक्स स्कँडलमुळे या नेत्यांचेही करिअर झाले उद्ध्वस्त; राजभवनात नकाे ते कृत्य अन् द्यावा लागला राजीनामा
20
अंगठाबहाद्दर म्हणून सरणावर जाणार नसल्याचा आनंद; ठाणे जिल्ह्यात १३ हजार ७७ निरक्षर झाले साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण

अभिमानास्पद! बीडचा डॉक्टर आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंची काळजी घेणार; फिफामध्ये निवड...

By प्रविण मरगळे | Published: October 02, 2022 4:00 PM

फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेत माजलगाव तालुक्यातील डॉ. अविनाश प्रभाकर कचरे यांची निवड करण्यात आली आहे.

पुरुषोत्तम करवा

माजलगाव: जागतिक स्तरावर होणाऱ्या फिफा आंतरराष्ट्रीय फुटबॉल विश्वचषक २०२२ या स्पर्धेत इमरजन्सी  मेडिसिन स्पेशालिस्ट डॉक्टर म्हणून माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथील रहिवासी डॉ.अविनाश प्रभाकर कचरे यांची निवड करण्यात आली आहे. इमरजन्सी  मेडिसिन स्पेशालिस्ट म्हणून  निवड होणारे महाराष्ट्रातील एकमेव डॉक्टर आहेत.

डॉ.अविनाश प्रभाकर कचरे, हे मूळचे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील राजेगावचे भूमिपुत्र. विळदघाट येथील डॉ. विखेपाटील मेडिकल कॉलेज अहमदनगर येथून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. तसेच केरळ राज्यातील तिरुअनंतपूरम येथील अनांथापुरी हॉस्पिटल येथून डी.एन.बी.इमरजन्सी मेडिसिनचे शिक्षण पूर्ण केले. ते सध्या पुणे येथील नोबल रुग्णालयात अतिदक्षता व अपघात विभाग प्रमुख काम पहात आहेत.डॉ. कचरे यांची कतार देशात २१ नोव्हेंबर ते १८ डिसेंबरमध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकात निवड झाली आहे. या विश्वचषकात येणाऱ्या खेळाडूंवर डॉक्टर कचरे हे उपचार करू शकणार आहेत. त्यांच्या या निवडीचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे. केंद्रिीय अर्थमंत्री राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनीही त्यांना अभिनंदन केले.

कतार देशातील शासकीय रुग्णालय असलेल्या हमात हॉस्पिटल हेल्थ कॉर्पोरेशन यांनी पाच वेळा माझी मुलाखत घेतली. या मुलाखतीनंतर माझी एक महिन्यापूर्वी  इमरजन्सी  मेडिसिन स्पेशालिस्ट डॉक्टर म्हणून  निवड झाली. त्यामुळे  मी ५ ऑक्टोबर ते २० डिसेंबर पर्यंत या ठिकाणी होणाऱ्या फुटबॉल मॅच मध्ये सहभागी होणार आहे.- डॉ.अविनाश प्रभाकर कचरे.

टॅग्स :FootballफुटबॉलBeedबीडdoctorडॉक्टरmajalgaon-acमाजलगांव