शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प प्रेरणाची चौकशी; उपसंचालकांकडून कानउघडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:40 IST

लोकमत फॉलोअप बीड : जिल्हा रुग्णालयातील प्रकल्प प्रेरणा विभागातील गैरप्रकाराची चौकशी उपसंचालकांनी मंगळवारी विभागात येऊन केली. यावेळीही त्यांना मानसोपचारतज्ज्ञांसह ...

लोकमत फॉलोअप

बीड : जिल्हा रुग्णालयातील प्रकल्प प्रेरणा विभागातील गैरप्रकाराची चौकशी उपसंचालकांनी मंगळवारी विभागात येऊन केली. यावेळीही त्यांना मानसोपचारतज्ज्ञांसह चार कर्मचारी गैरहजर दिसले. यावर त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली. आता याचा सर्व अहवाल संचालकांना पाठविला जाणार आहे. त्यामुळे प्रकल्प प्रेरणा विभागातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी स्थापन केलेल्या प्रकल्प प्रेरणा विभागाची कामगिरी अतिशय निराशाजनक आहे. ज्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासह मार्गदर्शन कार्यक्रमांसाठी तब्बल १२ लाख रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. तसेच या विभागाचे मानसिक आरोग्य केंद्रात रूपांतर झाल्यानंतरही ते कोणीच ओपीडीत बसत नसल्याचे समोर आले होते. हा सर्व प्रकार ‘लाेकमत’ने चव्हाट्यावर आणला होता. याची संचालिका डॉ. साधना तायडे यांनी गंभीर दखल घेत उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांना चौकशीचे आदेश दिले. त्याप्रमाणे ते मंगळवारी सकाळीच स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. भेट दिल्यानंतर त्यांना केवळ दोनच कर्मचारी हजर दिसले. यावर त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली. आता हा सर्व अहवाल संचालकांना दिला जाणार असून कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे.

विभाग प्रमुख महिनाभर रजेवर

‘लोकमत’ने प्रकल्प प्रेरणातील कारभार चव्हाट्यावर आणताच विभाग प्रमुख डॉ. सुदाम मोगले आजारी असल्याचे सांगत चौकशीच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी महिनाभर रजेवर गेले आहेत. असे असले तरी त्यांचा अहवाल मागील तीन वर्षांत डॉ. माेगले यांच्या स्वाक्षरीनेच हे १२ लाख रुपये उधळण्यात आले आहेत. यात त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

केवळ दोनच कर्मचारी हजर

उपसंचालकांच्या भेटीत मानसोपचारतज्ज्ञ विभागात हजर नव्हते. केवळ दोनच कर्मचारी हजर होते. डॉक्टरच नसल्यावर कर्मचारी कसे औषधी देणार आणि काय समुपदेशन करणार, असा सवाल डॉ. मालेंनी उपस्थित केला. खुलासा देताना अधिकाऱ्यांनी इतरांना कोरोनात ड्यूटी लावल्याची सारवासारव केली.

--

स्थलांतरित जिल्हा रुग्णालयाचा राउंड घेतला. फिजिशियन, स्त्रीरोगतज्ज्ञ व मानसोपचारतज्ज्ञ गैरहजर दिसले. त्यांच्यावर कारवाईच्या सूचना केल्या आहेत. तसेच प्रकल्प प्रेरणा व मानसिक आरोग्य केंद्रातील सर्व वास्तव परिस्थिती स्वत: पाहिली आहे. कारवाई करून अहवाल वरिष्ठांना देणार आहे. -

डाॅ. एकनाथ माले, उपसंचालक, लातूर

170821\17_2_bed_13_17082021_14.jpeg

स्थलांतरीत जिल्हा रूग्णालयाचा आढावा घेताना उपसंचालक डॉ.एकनाथ माले. सोबत डॉ.सुखदेव राठोड, डॉ.आय.व्ही.शिंदे, डॉ.कुलकर्णी आदी.