जिल्हयात कोरोना विषाणुचा वाढता प्रार्दुभाव असल्याने रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. २८ मार्च रोजी होळी,२९ मार्च रोजी धुलिवंदन, ३१ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीनुसार ) हे उत्सव आहेत. उत्सवानिमित्त मोठमोठे विविध कार्यक्रम व पारंपारिक उत्सव साजरे करण्याच्या उददेशाने लोक एकत्र येवून गर्दीचे स्वरुप हे मोठया प्रमाणवर निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव लक्षात घेता या कार्यक्रमांना या आदेशाव्दारे मज्जाव घालण्यात आला आहे. तसेच ३१ मार्च रोजी शब्बेबहार हा उत्सव साजरा होणार आहे. शब्बेबहार उत्सवानिमित्त नागरीक मोठया प्रमाणवर एका जागेवर जमा होतात. कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव लक्षात घेता शब्बेबहार हा उत्सव एकत्रितपणे साजरा करणे उचित नसल्याने या उत्सवास या आदेशाव्दारे मज्जाव घालण्यात आला आहे. या आदेशाचे पालन न करणारी,उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती,संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंध कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार गुन्हा केला असे मानून नियमानुसार कारवाई करण्यात येईल,असे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिले आहेत.
होळी, शब्बेबहार सण-उत्सवांना एकत्रित साजरे करण्यास मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:33 IST