शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोशाळेतील शेणांपासून गोमायी गणेशमूर्तींची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:39 IST

माजलगाव / पुरुषोत्तम करवा गोशाळेतील शेणापासून केमिकलविरहीत, पीओपी नसलेल्या गोमायी गणेशमूर्तींची निर्मिती माजलगावात करण्यात येत आहे. या मूर्तींना नागपूर, ...

माजलगाव / पुरुषोत्तम करवा

गोशाळेतील शेणापासून केमिकलविरहीत, पीओपी नसलेल्या गोमायी गणेशमूर्तींची निर्मिती माजलगावात करण्यात येत आहे. या मूर्तींना नागपूर, सिमला, मुंबई, पुणे या ठिकाणांहून मोठी मागणी आहे. येथील प्रकाश महाजन गोशाळेत हा आगळावेगळा प्रयोग करण्यात आला आहे.

येथील तेजस महाजन या युवकाने राज्यातील व परराज्यातील गोशाळांची पाहणी करून माहिती संकलन केली. स्वतःची गोशाळा असावी, गायींचे संवर्धन व संगोपन करण्याची मनोमन इच्छा होती. परंतु त्याकरिता जागा व गायी कुठून आणाव्यात, हा प्रश्न होता. माजलगाव धरणालगत मागील पाच वर्षांपूर्वी एक एकर जागा या गोशाळेसाठी खरेदी केली. गुजरात येथून गीर व देवणी जातीच्या गायी आणल्या. गायींच्या चारा व पाण्याची व्यवस्था केली. तीन वर्षांमध्ये या ठिकाणी सोळा गायी झाल्या.

दिवसेंदिवस पीओपीच्या गणेशमूर्तींमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनविण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी या गायींच्या शेणापासून तीनशे गणेशमूर्ती तयार केल्या. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे लॉकडाऊन असल्याने राज्यात विविध ठिकाणी पाठविण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. परंतु खचून न जाता यावर्षी जवळपास दीड हजार गणेश मूर्तींची निर्मिती केली. आज बाराशे गणेशमूर्तींची विक्री नागपूर, सिमला, पुणे, मुंबई याठिकाणी झाली असून अद्याप मोठी मागणी सुरू आहे. या गोशाळेतील जनावरांची पूर्ण देखभाल गोपीनाथ शेजुळ हे करतात.

चारा व्यवस्थापन

गोशाळेतील गायींची निवाऱ्याची सुविधा केली आहे तर पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचेही नियोजन केले आहे. एक एकर शेतामध्ये नेपीअर टु चारा लागवड केली आहे. धरणालगत मुबलक चारा व पाणी उपलब्ध आहे. परंतु उन्हाळ्यामध्ये चारा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पूर्ण एक एकरात चारा करत चारा व्यवस्थापन केले आहे.

--------

गायींचे दूध दिले जाते मोफत

गायी सांभाळणे आज जिकरीचे बनत चालले आहे. परंतु गोशाळेच्या माध्यमातून या गायींचे संगोपन केले जाते. गायींचे दूध आरोग्यास पोषक आहे. जन्मलेल्या बालकांपासून एक वर्षांच्या मुलांकरिता हे गायींचे दूध मोफत दिले जाते.

लहानपणापासूनच गायींचा लळा आहे

आपल्या मातीत गोशाळा असावी, हे स्वप्न पाच वर्षांपूर्वी पूर्ण झाले. या गायींपासून केवळ दूध उपलब्ध होते. या भावनेतून पाहिले जाते. परंतु शेण, गोमूत्र या मूल्यवर्धनातून पाहिल्यास निश्चितच शासनाच्या कुठल्याही अनुदानाची गरज गोशाळेसाठी भासत नाही. लेकराबाळांप्रमाणे गोशाळेत गायींचा सांभाळ होतो. शेणापासून बनवलेल्या बाराशे गणेशमूर्तींची विक्री झाली आहे. आठ युवकांना याठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याचा मनस्वी आनंद होतो. आगामी काळात परिसरातील गोशाळांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी पुढाकार घेणार आहे.

- तेजस महाजन, गोशाळा चालक तथा गणेश मूर्तिकार

170821\purusttam karva_img-20210816-wa0020_14.jpg~170821\purusttam karva_img-20210816-wa0019_14.jpg