शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पतीच्या जाचाला कंटाळून गर्भवती पत्नीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:39 IST

नांदूरघाट : हुंड्यातील आठ लाख रुपयांसाठी पोलीस पतीकडून सुरू असलेल्या अनन्वीत छळाला कंटाळून गर्भवती पत्नीने माहेरी गळफास घेऊन आत्महत्या ...

नांदूरघाट : हुंड्यातील आठ लाख रुपयांसाठी पोलीस पतीकडून सुरू असलेल्या अनन्वीत छळाला कंटाळून गर्भवती पत्नीने माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना दरडवाडी (ता.केज) येथे १२ सप्टेंबर रोजी घडली. गौराई सणाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने गाव शोक मग्न झाले. दरम्यान, पतीसह सासू व सासऱ्यावर गुन्हा नोंद झाला.

ज्योती गोविंद जाधवर (२४, रा. उक्कडगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. गोविंद जाधवर हा पोलीस अंमलदार असून सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात

कार्यरत आहे. ज्योतीचे वडील शिवाजी दराडे हे ऊसतोड मजूर आहेत. २०१८ मध्ये त्यांनी मुलीचा विवाह गोविंद जाधवर याच्याशी थाटामाटात लावला; परंतु लग्नानंतर तीन महिन्यांपासून सासू लताबाई, सासरा वचिष्ट व पती गोविंद हे ज्योतीला हुंड्यातील राहिलेल्या आठ लाख रुपयांसाठी त्रास द्यायचे. मी पोलीस आहे, तुझे आई-वडील ऊसतोड मजूर आहेत. तुझे भाऊ शेतीत काम करतात. या सर्वांना जेलमध्ये घालीन, अशा धमक्या गोविंद द्यायचा. वडील, चुलते, भाऊ यांनी उक्कडगाव या ठिकाणी जाऊन समजावून सांगितले. आणखी पैसे देऊ; पण मुलीला त्रास देऊ नका, अशी विनंती केली होती. ज्योतीला दीड वर्षाचा मुलगा असून ती दुसऱ्यांदा आठ महिन्यांची गरोदर आहे. मात्र, ११ रोजी मध्यरात्री गोविंदने ज्योतीला दरडवाडीत आणून सोडले.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी १२ सप्टेंबर रोजी माहेरकडील मंडळी शेतात गेले. सायंकाळी ते घरी परतल्यावर घरातील आडूला ज्योतीने दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. मयत ज्योतीचा भाऊ बबन दराडे यांच्या फिर्यादीवरून केज ठाण्यात पती गोविंद, सासू लताबाई व सासरा वचिष्ट जाधवर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, संतोष मिसळे यांनी घटनास्थळी भेट दिली.

....

पतीशी फोनवर बोलल्यानंतर टोकाचे पाऊल

मयत ज्योती आत्महत्या करण्यापूर्वी फोनवर पतीशी बोलत होती. जवळपास अर्धा तास तिचे पतीशी संभाषण सुरू होते, असे शेजाऱ्यांनी सांगितले. नांदूरघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांकडे दिला. १३ रोजी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

...

130921\13bed_17_13092021_14.jpg

ज्योती जाधवर