शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

इच्छा नसतानाही गर्भवती विवाहिता सासरी परतली; दुसऱ्या दिवशी आई-वडिलांना भेटला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 16:56 IST

पैसे, सोन्याच्या अंगठीसाठीच जीव घेतल्याचा माहेरच्या नातेवाईकांचा आरोप

ठळक मुद्देविवाहिता मृत्यू प्रकरणी पती, सासू, सासऱ्याविरुद्ध गुन्हामयत विवाहिता तीन महिन्यांची गर्भवती

सिरसाळा (जि. बीड) : परळी तालुक्यातील आचार्य टाकळी येथील विवाहिता मनीषा जगन्नाथ आचार्य (२२) बुधवारी घरात मृत अवस्थेत आढळली. त्यानंतर वडील मनोहर काळे यांच्या फिर्यादीवरून पती जगन्नाथ, सासरा संदीपान, सासू संजीवनी आचार्य यांच्याविरुद्ध हुंडाबळी कायद्यासह मनुष्य वधाच्या कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला. नातेवाईकांना साशंकता वाटल्याने त्यांनी अंबाजोगाई स्वाराती रुग्णालयात उत्तरीय तपासणी केली. डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात डोक्यात तसेच शरीरावर आतून मार लागल्याने मृत्यू झाल्याचा उल्लेख केला. 

पाडोळी येथील मनोहर काळे यांची मुलगी मनीषाचा विवाह आचार्य टाकळी येथील संदीपान आचार्य यांचा मुलगा जगन्नाथ याच्याशी गतवर्षी  झाला होता. जावई पाथरी येथील फार्मसी कॉलेजमध्ये नोकरीस असून त्यास मोठा हुंडाही दिला. लग्नानंतर चार महिन्यांतच कार घेण्यासाठी वडिलांकडून २ लाख रुपये घेऊन ये म्हणत, मनीषाचा सासरी छळ सुरू झाला. तसेच लग्नात सासूला सोन्याची अंगठी का घातली नाही म्हणून पतीसह सासू, सासरा मारहाण करीत. तिने हा प्रकार माहेरी आल्यावर आई-वडिलांना सांगितला. तिची सासरी जाण्याची इच्छा नसताना सर्वांनी समजूत घातल्यानंतर ती पुन्हा सासरी गेली. माहेरहून लवकर का आली नाही म्हणून त्याच दिवशी नवऱ्याने मनीषाला मारहाण केली. बुधवारी सकाळी एकाने काळे यांना तुमची मुलगी अत्यवस्थ असल्याचे फोनवरून सांगितले. तासाभरात वडील व इतर काही जण टाकळी येथे तिच्या घरी पोहोचले. त्यावेळी त्यांना मनीषाला फरशीवर टाकल्याचे दिसले. मनीषाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचे त्यांना सांगण्यात आले. 

२० तासांनंतर अंत्यसंस्कार, गावांत हळहळअंबाजोगाई स्वाराती रु ग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणण्यात आला. सासरच्या मंडळीवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह न हलविण्याचा नातेवाईकांनी पवित्रा घेतला असता योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सिरसाळा पोलिसांनी नातेवाईकांना दिले. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास २0 तासांनंतर माहेरी पाडोळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तोपर्यंत सर्व गाव जागेच होते. मनीषा  आचार्य या तीन महिन्यांच्या गर्भवती असल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. 

पैसे, सोन्याच्या अंगठीसाठीच घेतला जीवदरम्यान, पैसे व सोन्याच्या अंगठीसाठीच नवऱ्यासह सासू, सासऱ्यांनी संगनमत करून मनीषा यांना मारून टाकल्याची फिर्याद मनोहर काळे यांनी पोलिसांत दिली. सासरकडील तिघांविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जनक पुरी करीत आहेत.

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाMurderखूनdowryहुंडाBeedबीड