स्वच्छतेची मागणी
बीड : तालुक्यातील चौसाळा येथील बाजारतळ तसेच बाजारपेठेत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीकडे स्वच्छतेची मागणी करूनदेखील स्वच्छता केली जात नाही. याकडे लक्ष घालून स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
कोंडवाडा दुरुस्तीकडे दुर्लक्ष
बीड : मोकाट गुरांना कोंडण्यासाठी पालिकेच्या मालकीचा कोंडवाडा आहे. परंतु, त्याची दुरवस्था झालेली आहे. मागील अनेक वर्षांपासून त्याची दुरुस्ती झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. शहरात मोकाट गुरांचा वावर वाढला आहे. कोंडवाडा दुरूस्त करून मोकाट गुरांना त्यात कोंंडावे अशी मागणी होत आहे.
अतिक्रमणांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
माजलगाव : शहरातील बसस्थानकासह शासकीय कार्यालयांच्या इमारतींना अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा होत आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावर हातगाड्यांची गर्दी असते. याबाबत येथील नागरिक तक्रारी करत आहेत. परंतु याकडे अद्यापही संबंधितांनी दुर्लक्ष केले आहे.