शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मठाधिपतीच्या मोबाईलमध्ये मिळाले अश्लील फोटो, चित्रफित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क केज : तालुक्यातील लव्हुरी येथील लालगिरी बाबा मठाचे मठाधिपती तथा भागवताचार्य वासुदेव शास्त्री याच्या मोबाईलमध्ये पीडित ...

ठळक मुद्देउत्तर प्रदेश पोलिसांकडून कसून चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्ककेज : तालुक्यातील लव्हुरी येथील लालगिरी बाबा मठाचे मठाधिपती तथा भागवताचार्य वासुदेव शास्त्री याच्या मोबाईलमध्ये पीडित मुलींसह यापूर्वी शिष्य म्हणून गेलेल्या ६ मुलींचे अश्लील फोटो आणि चित्रफिती उत्तर प्रदेशातील पोलिसांना तपास करताना मिळून आल्या आहेत. महाराष्ट्रातील दोन मुलींचा लैंगिक छळ केल्यावरून या मठाधिपतीविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे.पुणे आणि कळवा मुंबई येथील दोन युवतींच्या नातेवाईकांचा विश्वास संपादन करून त्यांना हा मठाधिपती वृंदावन येथे रामायण आणि भागवत शिकविण्यासाठी घेऊन गेला. त्या ठिकाणी मोती झील परिसरात या मुलींना किरायाने खोली करून दिली आणि स्वता: घीसा महामंडळाच्या आश्रमात राहत होता. या युवतींचे चोरून अश्लील फोटो आणि चित्रफित बनवून त्यांना हा शास्त्री ब्लॅकमेल करून त्यांचे लैंगिक शोषण करीत असल्याचे २७ डिसेंबर रोजी समोर आले होते. त्याच्याविरूद्ध उत्तर प्रदेशातील वृंदावन जि. मथुरा या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी पीडित दोन युवती आणि त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारीनुसार कलम १६४ प्रमाणे मथुरा न्यायालयात न्यायाधीशासमोर ‘इन कॅमेरा’ जवाब नोंदविण्यात आले आहेत.दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करुन गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केज तालुक्यातून होत आहे.या प्रकरणाचे तपासअधिकारी पोलीस उपनिरीक्षक रामसिंग द्विवेदी म्हणाले, शास्त्रीच्या मोबाईलमध्ये अश्लिल फोटो आणि चित्रफित आढळल्या आहेत. महिला आणि मुलींचे मोबाईल नंबरचे सिडीआर काढण्यात आले आहेत. इतर संशयितांचीही चौकशी सुरू असल्याचे ते म्हणाले.या पीडित युवतींना मनोधैर्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्यसाचे आ.संगीता ठोंबरे यांनी सांगितले.