शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्य जनतेला वेठीस धरल्यास पोलिसांवर कारवाई करणार - पोद्दार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 00:30 IST

सध्या बीड जिल्ह्यात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या तक्रारी येतात. पण ठोस पुरावे नसल्याने कारवाई करता येत नाही. तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करा. तडजोड करत असतील तर शूटिंग करा अशा अधिकारी, कर्मचारी यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिला.

ठळक मुद्देजनता दरबार : कडा पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी

कडा : सध्या बीड जिल्ह्यात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या तक्रारी येतात. पण ठोस पुरावे नसल्याने कारवाई करता येत नाही. तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करा. तडजोड करत असतील तर शूटिंग करा अशा अधिकारी, कर्मचारी यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिला.आष्टी पोलीस ठाण्यात सोमवारी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हे वार्षिक तपासणीसाठी आले असता आयोजित जनता दरबारात जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते. तालुक्यात जर कोणी अधिकारी, कर्मचारी जर तडजोड आणि आर्थिक मनस्ताप देऊन अडवणूक करत असतील तर तक्रार देऊ नका; फक्त शूटिंग किंवा रेकॉर्डिंग करा मी लगेच कारवाई करेल असे आश्वासन त्यांनी दिले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. बाळासाहेब आजबे, माजी आ. साहेबराव दरेकर, किशोर हंबर्डॅ, माजी जि.प. अध्यक्ष डॉ. शिवाजी राऊत, नगरसेवक दीपक निकाळजे, अरुण निकाळजे, नामदेव राऊत, आण्णासाहेब चौधरी, राम खाडे, सुरेखा केरूळकर, सरपंच अनिल ढोबळे, सादिक कुरेशी, काकासाहेब शिंदे, अनंत जोशी, डॉ. शैलजा गर्जे, उपअधीक्षक विजय लगारे, पो.नि. माधव सुर्यवंशी, पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील, होमगार्ड, पोलीस मित्र, नागरिक उपस्थित होते.महिला मुलीची छेडछाड, रहदारीचा अडथळा४तालुक्यात सर्वाधिक शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ, असल्याने मोठ्या प्रमाणावर महिला व मुलीची संख्या असल्याने छेडछाड रोखावी. कडा , आष्टी येथील रहदारीला अडथळा निर्माण होत आहे तो मार्गी लावावा, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबद्दल जनतेने यावेळी त्यांच्याकडे तक्रारी केल्या.

टॅग्स :BeedबीडBeed S Pपोलीस अधीक्षक, बीड