शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

निधीतून पोलीस पाल्यांचे ‘कल्याण’; उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती ठरतेय लाभदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:22 IST

पोलीस अधिकारी, कर्मचा-यांच्या पाल्यांना शिक्षणात आर्थिक हातभार लावून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत ‘कल्याण’ करण्यात बीड पोलीस दलाला यश येत आहे. ‘पोलीस कल्याण निधी’तून उच्च शिक्षण घेणा-यांना शिष्यवृत्तीसह कर्ज व इतर योजनांचा लाभ दिला जात आहे. तसेच इतर योजनांचाही पुरेपुर लाभ दिला जात असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पोलीस अधिकारी, कर्मचा-यांच्या पाल्यांना शिक्षणात आर्थिक हातभार लावून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत ‘कल्याण’ करण्यात बीड पोलीस दलाला यश येत आहे. ‘पोलीस कल्याण निधी’तून उच्च शिक्षण घेणा-यांना शिष्यवृत्तीसह कर्ज व इतर योजनांचा लाभ दिला जात आहे. तसेच इतर योजनांचाही पुरेपुर लाभ दिला जात असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.पोलीस दलातील शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलीस कल्याण निधीचे सभासद असलेले लिपीक वर्गीय अधिकारी, कर्मचारी यांच्या पाल्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन योजनेतून २५ हजार रूपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. आतार्यंत १६ लाभार्थ्यांना चार लाख रुपयांची शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली आहे.

ज्यांना पैशांची अडचण आहे, त्यांना कर्जस्वरूपात ५० हजार रुपये कर्जही दिले जात असल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत ३३ लोकांना १५ लाख ७८ हजार ३०० रुपये शैक्षणिक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

शिष्यवृत्ती, कर्जाबरोबरच ११८ लाभार्थ्यांना त्यांच्या गुणवत्ता आणि वर्गानुसार २ लाख ५९ हजार रुपयांचे पुस्तक अनुदान दिले आहे. १४४ मुलींकरीता दप्तर योजनेतून ७२ हजार रूपये वाटप केले. ६ लोकांना ७२ हजार रूपयांचे अंत्यविधी अनुदान देण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस कल्याण निधी सध्या पोलीस पाल्यांना शिक्षणासाठी मोठा हातभार लावत आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बो-हाडे यांचे याकडे विशेष लक्ष असते.