शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पिकांवर नव्हे, शेतकऱ्याच्या काळजावर फिरतोय नांगर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:34 IST

अविनाश कदम आष्टी : कोरोना महामारीमुळे बाजारपेठा बंद आहेत. भर उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई असताना शेतात पिकवलेला भाजीपाला कवडीमोल ...

अविनाश कदम

आष्टी : कोरोना महामारीमुळे बाजारपेठा बंद आहेत. भर उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई असताना शेतात पिकवलेला भाजीपाला कवडीमोल भावात विकावा लागत आहे. शेतकऱ्यांचा भाजीपाला पिकतो; पण विकत नाही. या नैराश्यातून सोमवारी अनिकेत मोकासे या तरुण शेतकऱ्याने पिकवलेल्या वांग्याच्या प्लाॅटवर ट्रॅक्टरच्या साह्याने नांगर फिरवला आहे.

पारगाव जोगेश्वर शेतकरी अनिकेत मोकासे यांनी एका अर्धा एकरवर वांग्याचे पीक घेतले होते. वांगी पीक चांगले बहरले होते. उन्हाळ्यात पाणी टंचाईची तीव्रता असतानाही वांगी पीक जपले. वांग्याच्या झाडाला वांगी चांगली लगडली होती; परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. आठवडी बाजार बंद झाले. यामुळे वांग्याला भाव राहिले नाहीत. या वांगी पिकांपासून मोकासे यांना ५० ते ८० हजारांचे उत्पन्न अपेक्षित होते; परंतु सध्या वांग्याचे कॅरेट ५० ते ६० रुपयांना विकत आहे. त्यामुळे पदरमोड करून वाहतुकीचा खर्चही मिळत नाही. या शेतकऱ्याने उभ्या वांग्याच्या प्लाॅटमध्ये ट्रॅक्टर फिरवला आहे.

...

भाजीपाला न पिकवलेला बरा

लॉकडाऊनमुळे शेतकरी भाजीपाला शेतातच फेकून देत आहेत, तर काही शेतात जनावरांना पीक चारत असल्याचे दृश्‍य दिसत आहेत. माल पिकला तर विकत नाही, अशी परिस्थिती ग्रामीण भागात आहे. तोडणीचा खर्च, वाहतूक करण्यासाठी लागणारा खर्च निघत नाही. स्वतःच्या खिशातून मजुरांचा खर्च द्यावा लागतो. त्यामुळे माझे अर्धा एकर असलेल्या वांग्याच्या प्लाॅटमध्ये नांगर फिरवला आहे. यामुळे भाजीपाला न पिकवलेला बरा.

-अनिकेत मोकासे, शेतकरी, जोगेश्वरी पारगाव, ता. आष्टी.

===Photopath===

110521\img-20210511-wa0202_14.jpg