शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
7
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
8
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
9
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
10
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
11
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
12
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
13
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
14
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
15
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
16
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
17
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
18
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
19
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
20
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क

ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:33 IST

वाकलेल्या खांबामुळे धोका अंबाजोगाई : तालुक्यात व शहरात जुन्या वसाहती अनेक ठिकाणी विद्युत खांब अनेक ठिकाणी वाकलेले आहेत. विद्युत ...

वाकलेल्या खांबामुळे धोका

अंबाजोगाई : तालुक्यात व शहरात जुन्या वसाहती अनेक ठिकाणी विद्युत खांब अनेक ठिकाणी वाकलेले आहेत. विद्युत तारा जीर्ण झालेल्या आहेत. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रोवण्यात आलेले पोल वाकडे झाल्यामुळे तारा लोंबकाळत आहेत. या लोंबकाळणा‌ऱ्या तारांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी विद्युत खांबांमधील अंतर जास्त असल्याने तारा लोंबकाळत आहेत. अशा ठिकाणी नवीन विद्युत खांब लावण्यात यावेत. शहरातील जीर्ण झालेल्या तारा व पोल बदलण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रा.दि.ना.मुडेगावकर यांनी केली आहे.

वाढत्या तापमानाने नागरिक त्रस्त

अंबेजोगाई : शहर व परिसरात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. मार्च महिन्याच्या प्रारंभीपासूनच उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून तर भर दुपारी उन्हाचे चटके चांगलेच जाणवू लागले आहेत. वाढत्या उन्हामुळे सकाळच्या प्रहरीच कामे आटोपण्याकडे शेतकरी वर्गाचा कल दिसून येत आहे. दिवसा कडक ऊन तर रात्रीच्या वेळी वातावरणात गारवा राहत आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढली

अंबेजोगाई : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तालुक्यात दररोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच आहे. शुक्रवारी अंबेजोगाई तालुक्यात कोरोनाचे शंभर रुग्ण निघाले, तर शनिवारी पुन्हा १४५ रुग्ण निघाले. तालुक्यात आजपर्यंत ११ हजारांहून जास्त रुग्ण कोरोनाबाधित निघाल्याने शहरी व ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे.

कडेकोट पोलीस बंदोबस्त

अंबेजोगाई : तालुक्यात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे कडेकोट बंदोबस्त प्रत्येक चौकात तैनात ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये, म्हणून पोलिसांच्या व्हॅन गस्त घालू लागल्या आहेत, तर ग्रामीण भागातही ग्रामीण पोलीस ठाणे, बर्दापूर पोलीस ठाणे यांच्या वतीने गावोगावी गस्त सुरू असून, ग्रामीण भागातही आवश्यकतेप्रमाणे पोलीस यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे.