केज शहर हे वडाच्या झाडाचे गाव म्हणून सर्वपरिचित होते, मात्र कालांतराने विविध कारणांमुळे शहरातील वडाची झाडे नामशेष झाल्याने रोटरी क्लब ऑफ केजने हा उपक्रम हाती घेतला आहे. केज पोलीस ठाण्याच्या आवारात दहा वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले, तसेच मंगल कार्यालय परिसरातही वटवृक्ष लावण्यात आले. वृक्षारोपणप्रसंगी प्रोजेक्ट चेअरमन रो. श्रीराम शेटे, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष हनुमंत भोसले, प्रवीण देशपांडे, दादाराव जमाले, सीताताई बनसोड, महेश जाजू, अरुण अंजान, लोखंडे, वसंत चाळक, भाजप नेते दत्ता धस, एल. डी. यादव महाराज आदी यावेळी उपस्थित होते.
250721\img-20210725-wa0011.jpg
रोटरी क्लब ऑफ केजच्या वतीने वट वृक्षाचे वृक्षारोपण करताना रोटरीचे अध्यक्ष बापूराव शिगण , प्रा हनुमंत भोसले,प्रवीण देशपांडे,अरुण अंजान ,श्रीराम शेटे ,सीता बनसोड,महेश जाजु ,आदी .