बीड जिल्हा काँग्रेस कमिटीकडून स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयासमोर माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सामाजिक बांधिलकीतून अंबाजोगाई शहर व परिसरातील संत भगवान बाबा चौक ते साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक या दरम्यान रस्त्याच्या एका बाजूने २५० विविध वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाची सुरुवात राजकिशोर मोदी यांच्या हस्ते करण्यात आली.
याप्रसंगी अंबाजोगाई काँग्रेसचे तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष नगरसेवक महादेव आदमाने, नगरसेवक मनोज लखेरा, नगरसेवक अमोल लोमटे, नगरसेवक वाजेद खतीब, नगरसेवक सुनील व्यवहारे, धम्मपाल सरवदे, सुनील वाघाळकर, राणा चव्हाण, कचरू सारडा, भारत जोगदंड, सचिन जाधव, अजीम जरगर आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
030721\03bed_3_03072021_14.jpg