शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय असल्याचे बनावट कागदपत्रे दाखल केल्याने सरपंचाविरुद्ध याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 11:51 IST

सरपंचपदाच्या निवडणुकीत घरात शौचालय असल्याचे व ते वापरात असल्याचे बनावट प्रमाणपत्र दाखल केलेल्या सरपंचाविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे ग्रामपंचायत (चिचखंडी ता.अंबाजोगाई) येथे  ७ आॅक्टोबर १७ रोजी निवडणूक झाली. उमेदवारी अर्जासोबत शौचालय असल्याबाबत प्रमाणपत्र व शौचालय वापराबाबत ग्रामसभेचा ठराव या अटींची पूर्तता आवश्यक होती.

अंबाजोगाई (बीड) : सरपंचपदाच्या निवडणुकीत घरात शौचालय असल्याचे व ते वापरात असल्याचे बनावट प्रमाणपत्र दाखल केलेल्या सरपंचाविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी बीड यांच्या कार्यालयात संगीता नवनाथ होके यांच्याविरुद्द सविता भाऊराव होके यांनी याचिका दाखल केली आहे. 

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०१७ अंतर्गत ग्रामपंचायत (चिचखंडी ता.अंबाजोगाई) येथे  ७ आॅक्टोबर १७ रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीत सरपंचपद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित होते. उमेदवारी अर्जासोबत शौचालय असल्याबाबत प्रमाणपत्र व शौचालय वापराबाबत ग्रामसभेचा ठराव या अटींची पूर्तता आवश्यक होती. यासाठी किसन नाथा होके यांच्या घर क्र. १५ चे सदरील कागदपत्र हस्तगत करण्यासाठी सरपंचपदी निवडून आलेल्या संगीता नवनाथ होके यांनी गैरमार्गाचा अवलंब केल्यानंतर रमाई घरकुल योजना लाभार्थी अभिमान श्रीपती होके यांच्या घर क्र. १४ मध्ये किरायाने राहत असल्याच्या खोट्या व बनावट कागदपत्रांचा गैरवापर केला. याचा सक्षम प्रशासकीय यंत्रणेद्वारे तपास केला असता घर क्र. १४ मध्येही शौचालय नसल्याचे स्पष्ट झाले. या गावात ग्रामपंचायतचे सार्वजनिक शौचालयही नाही. 

या प्रकरणी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या २७ सप्टेंबरच्या आदेशान्वये महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा १९५८ अंतर्गत १४ (१) (जे-५) कलमान्वये ७ नोव्हेंबर २०१७ रोजी जिल्हाधिकारी बीड यांच्या कार्यालयात संगीता नवनाथ होके यांच्याविरुद्द सविता भाऊराव होके यांनी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात सक्षम प्रशासकीय यंत्रणेद्वारे तपासात शौचालय नसल्याचे निष्पन्न झाल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्हाधिका-यांकडे दाखल याचिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष होते.

उच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्हाधिका-यांकडे दादउमेदवारीसोबत शौचालय असल्याबाबत प्रमाणपत्र व शौचालय वापराबाबत ग्रामसभेचा ठराव या अटींची पूर्तता आवश्यक होती. यासाठी सरपंचपदी निवडून आलेल्या संगीता होके यांनी गैरमार्गाचा अवलंब करुन अभिमान होके यांच्या घरात रहात असल्याच्या खोट्या व बनावट कागदपत्रांचा गैरवापर केला.