शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

शिपाई वेळेवर हजर; अधिकारी, कर्मचारी गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:56 IST

बीड पालिकेतील अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत येत नाहीत. मनमानी कारभार चालवितात, याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी पाणीपुरवठा व बांधकाम सभापतींनी सकाळी १०:३० वाजता मुख्य दरवाजा बंद करून पालिकेतील उपस्थित अधिकारी, कर्मचाºयांची संख्या मोजली. यामध्ये सात विभागात केवळ शिपाई होते, तर दोन विभागाचे कुलूपच उघडले नव्हते. प्राप्त झालेल्या तक्रारींवर या आॅडिटमधून पालिकेतील गलथान कारभार चव्हाट्यावर आला.

ठळक मुद्दे सभापतींकडून ‘आॅडिट’ मुख्याधिकाºयांनी बजावल्या ‘लेटलतिफा’-ना नोटिसा

बीड : बीड पालिकेतील अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत येत नाहीत. मनमानी कारभार चालवितात, याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी पाणीपुरवठा व बांधकाम सभापतींनी सकाळी १०:३० वाजता मुख्य दरवाजा बंद करून पालिकेतील उपस्थित अधिकारी, कर्मचाºयांची संख्या मोजली. यामध्ये सात विभागात केवळ शिपाई होते, तर दोन विभागाचे कुलूपच उघडले नव्हते. प्राप्त झालेल्या तक्रारींवर या आॅडिटमधून पालिकेतील गलथान कारभार चव्हाट्यावर आला.मागील काही दिवसांपासून बीड पालिकेत अधिकारी, कर्मचाºयांची मनमानी सुरू आहे. मनमानी कारभार चालविण्याबरोबरच कार्यालयीन वेळत येत नाहीत. तसेच कार्यालयात आल्यावर सर्वसामान्यांची कामे मार्गी लावली जात नाहीत, कामचुकारपणा करून कार्यालयातून काढता  पाय घेतला जातो. हाच धागा पकडून काकू-नाना आघाडीचे नगरसवेक व बांधकाम सभापती अमर नाईकवाडे, पाणीपुरवठा सभापती फारूक पटेल यांनी मंगळवारी सकाळी पालिकेत धाव घेतली. १०:३० वाजताच त्यांनी मुख्य दरवाजा बंद करून घेतला. यावेळी पालिकेत शुकशुकाट होता. ११ वाजेपर्यंत पाच-सात कर्मचारी दरवाजाजवळ आले. ११:३० वाजता पालिकेत अधिकारी, कर्मचाºयांची गर्दी वाढली. परंतु १०० टक्के उपस्थिती नव्हती.दरम्यान, नाईकवाडे व पटेल यांनी सुरूवातीला जन्ममृत्यू, आवक-जावक, अस्थापना विभागात पाहणी केली. यामध्ये केवळ आवक-जावक विभागातील महिला व कॅशिअर अमोल शिंदे उपस्थित होते. त्यानंतर ते सुवर्ण जयंती विभागात गेले. येथे महिला शिपाई दरवाजा उघडत होत्या. मलेरिया, महिला व बालकल्याण विभागातही हीच परिस्थिती होती. आरोग्य विभग कुलूपबंद होता. नगर रचना विभागतही सय्यद लईक उपस्थित होते. इतर गैरहजर होते. पटेल सभापती असलेल्या पाणीपुरवठा विभागात केवळ महिला शिपाई होत्या. तर नाईकवाडे सभापती असलेल्या बांधकाम विभागात दोन कर्मचारी व शिपाई हजर होत्या. लेखा विभाग शिपायावरच होता.विद्यूत विभागात सर्व कर्मचारी हजर होते. वसुली विभागातील कर्मचारी वसूलीला गेल्याचे  सांगितले.

 मुख्याधिकाºयांसमोर ठिय्या पालिकेतील गैरहजर अधिकारी, कर्मचाºयांचे आॅडिट करून सभापतींनी मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांच्याकडे धाव घेत ठिय्या मांडला. गैरहजर कर्मचाºयांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच यापुढे कार्यालयीन वेळेतच अधिकारी, कर्मचाºयांनी यावे, असे आदेश देण्याची मागणीही सभापतींनी केली.  नगराध्यक्ष, सभापतींना सक्ती करा अधिकारी, कर्मचाºयांबरोबरच नगराध्यक्ष व सभापतींनाही आपल्या कक्षात बसण्यासंदर्भात बंधनकारक करावे. यासंदर्भात आम्ही सभेत आवाजही उठविला होता. परंतु नगराध्यक्षांनी याकडे डोळेझाक केली. यामध्ये कसलेही राजकारण नसून पालिकेतील अधिकारी, कर्मचाºयांना शिस्त लावण्यासाठी आम्ही हे आॅडिट केले.    - अमर नाईकवाडे, फारूक पटेल,