शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

निसर्गदूत पुरस्कार सोहळ्यात मोराची निसर्ग भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:39 IST

शिरूर कासार : गेल्या २१ वर्षांपासून वन्यजीव संरक्षण व संवर्धनाचे नि:स्वार्थपणे अखंड कार्य करणाऱ्या तागडगाव येथील सर्पराज्ञी वन्यजीव ...

शिरूर कासार : गेल्या २१ वर्षांपासून वन्यजीव संरक्षण व संवर्धनाचे नि:स्वार्थपणे अखंड कार्य करणाऱ्या तागडगाव येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय पक्षी मोराला निसर्गाच्या स्वाधीन करण्यात आले. तसेच दुर्मीळ व अतिदुर्मीळ वृक्ष बीज संकलनात सर्पराज्ञीला नि:स्वार्थ मदत करणाऱ्यांचा सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते ‘निसर्गदूत’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी विभागीय वनअधिकारी अमोल सातपुते, संतोष मानूरकर, कृषिभूषण शिवराम घोडके, वैभव स्वामी आदी उपस्थित होते.

सिद्धार्थ व सृष्टी सोनवणे या दांपत्याने सर्पराज्ञी प्रकल्पाची उभारणी करून २१ वर्षांपासून वन्यजीव संरक्षण, संवर्धन व पुनर्वसनाचे ऐतिहासिक काम अव्याहतपणे चालवले आहे. याठिकाणी जखमी, आजारी, मातृत्वापासून दुरावलेल्या वन्य पशुपक्ष्यांवर उपचार करून ते निसर्गात जगण्यात जोपर्यंत सक्षम होत नाहीत तोपर्यंत त्यांची सेवा सुश्रूषा केली जाते. पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना त्यांच्या मूळ अधिवासात निसर्गात सोडण्यात येते. शनिवारी सर्पराज्ञीत गंगाई नक्षत्र वनात हा पुरस्कार कार्यक्रम झाला.

निसर्गदूत पुरस्काराचे मानकरी वायवर्ण या अतिदुर्मीळ वृक्ष बीज संकलनासाठी रेणापूर येथील शिवशंकर चापुले, अहमदनगरचे संदीप राठोड, पिवळी काटेसावर संकलनासाठी दीपक पाटील, माकूनसार, पालघर,पांढरा पळससाठी रवींद्र मुंडे, वडवणी, कृष्णवड शाल्मली नलावडे, पुणे, पिवळा पळस-जालिंदर भस्करे, बीड, कुसुंब दीपक थोरात, मुगगाव, काटेसावर डॉ. लहू थोरात, मुगगाव, चारोळी पवन भिंगारे, झापेवडी, कैलासपती विजयकुमार गाडेकर, शिरूर कासार, सर्पमित्र महेश औसरमल, शिरूर कासार, कापूर-शरद इंगावले, पिंपरी चिंचवड यांना स्मृतिचिन्ह प्रशस्तिपत्र व वृक्षभेट देण्यात आले.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप शिंदे, अशोक काकडे, वनपाल धसे, लहू बोराटे, रामनाथ कांबळे, गोकुळ पवार, अशोक शिंदे, जालिंदर ननावरे यांच्यासह निसर्गप्रेमी उपस्थित होते. सूत्रसंचालन मुग्धा नलावडे यांनी, प्रास्ताविक सिद्धार्थ सोनवणे, तर आभार सचिन नलावडे यांनी मानले.

160821\img-20210815-wa0019.jpg

फोटो