शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात लाखोच्या ठेवी घेऊन पतसंस्था अध्यक्ष फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 18:13 IST

शहरातील एका नागरी सहकारी पतसंस्थेत अनेक ठेवीदारांनी लाखोंच्या ठेवी ठेवल्या होत्या. मात्र,पतसंस्थेच्या अध्यक्षानेच मोठया प्रमाणावर अपहार केल्यामुळे पतसंस्था आर्थिक अडचणीत आली आहे.यामुळे ठेवीदारांना देण्यासाठी पतसंस्थेत छदामही नाही. तसेच संस्थाध्यक्ष फरार झाल्याने आता ठेवीदारांनी सहनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे धाव घेतली आहे.

ठळक मुद्दे अध्यक्ष पळुन गेल्यामुळे ठेवीदारांनी घेतली सह निबंधकांकडे धावअध्यक्षाच्या प्रतापामुळे संचालक मंडळ गोत्यात सहनिबंधकांचे कारवाईचे संकेत.ठेवीदारांच्या तगाद्यामुळे अनेक दिवसांपासुन पतसंस्था कार्यालय बंद

माजलगाव ( बीड )दि.19 : शहरातील एका नागरी सहकारी पतसंस्थेत अनेक ठेवीदारांनी लाखोंच्या ठेवी ठेवल्या होत्या. मात्र,पतसंस्थेच्या अध्यक्षानेच मोठया प्रमाणावर अपहार केल्यामुळे पतसंस्था आर्थिक अडचणीत आली आहे.यामुळे ठेवीदारांना देण्यासाठी पतसंस्थेत छदामही नाही. तसेच संस्थाध्यक्ष फरार झाल्याने आता ठेवीदारांनी  सहनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे धाव घेतली आहे.

माजलगांव शहरात मोठया प्रमाणावर पतसंस्था आहेत.या पतसंस्थेच्या संचालक मंडळावर अनेक प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांच्यामुळे अनेकजण आपला मेहनतीने कमावलेला पैसा पतसंस्थांमध्ये ठेवतात. मोंढा येथील जयआनंद नागरी पतसंस्थेत शहरातील अनेकांनी आपला घामाचा पैसा गुंतवलेला होता.परंतु, पतसंस्थेचा अध्यक्ष विजय ललवाणी यांनी कर्ज वसुलीचा पैसा संस्थेत जमा न करता मोठया प्रमाणावर अपहार केला.त्यामुळे कर्जदारांनी कर्जफेड केलेली असली तरी त्यांना बेबाकी प्रमाणपत्र मिळत नाही. तर दुसरीकडे वसुली अभावी संस्था गोत्यात आली आहे. ठेवी परत मिळत नसल्याने आणि संस्था कायम बंद दिसत असल्याने ठेविदारांनी आता सहनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे धाव घेतली आहे.

दरम्यान,पतसंस्थेच्या अध्यक्षाला सहनिबंधक यांनी  संपर्क  केला असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली.आता तर तो फोन बंद करुन फरार झाला असल्याची माहिती समोर येत आहे. अध्यक्षच फरार झाल्यामुळे संचालक मंडळ मात्र चांगलेच गोत्यात आले आहे.

अनेकांचा जीव टांगणीलापतसंस्थेचे कार्यालय कायम बंद असल्याने आता ठेवीदारांना नेमके कुठे जावे असा प्रश्न ठेवीदारांना पडला आहे. याप्रकरणी ठेवीदार तुकाराम जोशी यांनी आपले 6 लाख 50 हजार रुपये या पतसंस्थेकडुन वसुल करुन द्यावेत अशी रितसर तक्रारच सहनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे केली आहे. मोंढा भागात असलेल्या अनेक व्यापारी तथा नागरीकांच्या ठेवी या बॅंकेत आहेत.अध्यक्ष फरार तर संचालकांची चुप्पी साधल्याने ठेवीदारांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. 

चौकशी  करुन कारवाई करूपतसंस्था ठेवी परत करीत नसल्याची तक्रार या कार्यालयाला प्राप्त झाली आहे. पतसंस्थेच्या अध्यक्षाला संपर्क करण्यात आलेला आहे.परंतु,योग्य प्रतिसाद मिळत नाही.चौकशी  करुन संचालक मंडळावर कारवाई करण्यात येईल.-एस.बी. घुले, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था , माजलगांव