शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

अतिदक्षता विभागातील रुग्णाची खिडकीतून उडी मारून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:23 IST

अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील घटनेने खळबळ अंबाजोगाई : विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील अतिदक्षता ...

अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील घटनेने खळबळ

अंबाजोगाई : विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्या रुग्णाने रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील शौचालयातील खिडकीतून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. २८ जून रोजी पहाटे ही घटना घडली.

प्रकाश उत्तम राठोड (वय ३६, रा. साकूड, ता. अंबाजोगाई) असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून प्रकाशने शनिवारी (२६ जून) विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर नातेवाइकांनी त्याला स्वाराती रुग्णालयात दाखल केले होते. तिथे त्याच्यावर पहिल्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत होते. परंतु, सोमवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास प्रकाशने बांधलेले हात कसेबसे मोकळे केले आणि हाताचे सलाईन काढून टाकून अतिदक्षता विभागाच्या बाहेर आले. त्यानंतर समोरच असलेल्या डायलिसिस विभागातील शौचालयात तो गेला. शौचालयाच्या खिडकीचे गज काढून त्याने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने खाली उडी मारली. या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. उपस्थितांनी त्याला तातडीने अपघात विभागात दाखल केले असता तिथे उपचारादरम्यान पहाटे ३ वाजता प्रकाशचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रकाशच्या पत्नीच्या जबाबावरून अंबाजोगाई शहर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.