शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पाटोद्यात वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने रुग्णाचा मृत्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 23:25 IST

पाटोदा येथील ग्रामीण रूग्णालयात नेमून दिलेले वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. नातेवाईकांनी संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. दुपारी वैद्यकीय अधीक्षकांनी संबंधित वैद्यकीय अधिकाºयास कार्यमुक्त करीत असल्याचे पत्र नातेवाईकांना दिल्यानंतर तणाव निवळला.

ठळक मुद्देवैद्यकीय अधिकारी कार्यमुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : येथील ग्रामीण रूग्णालयात नेमून दिलेले वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. नातेवाईकांनी संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. दुपारी वैद्यकीय अधीक्षकांनी संबंधित वैद्यकीय अधिकाºयास कार्यमुक्त करीत असल्याचे पत्र नातेवाईकांना दिल्यानंतर तणाव निवळला.

नानाभाऊ जगन्नाथ लऊळ (५५) असे उपचाराअभावी निधन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शेती आणि मुकादम असा त्यांचा व्यवसाय होता. रविवारी सकाळी त्यांना छातीत त्रास होऊ लागल्याने येथील खाजगी रूग्णालयात दाखवले. तेथून सरकारी रूग्णालयात दाखवण्याचा सल्ला दिला गेला. त्यावरून त्यांना ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. ग्रामीण रूग्णालयात त्यावेळी केवळ एक परिचरिका आणि शिपाई उपस्थित होते.वैद्यकीय अधिकारी नसल्याने नानाभाऊ यांच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, शहरामध्ये निधनाची माहिती वाºयासारखी पसरली. लऊळ आणि त्यांच्या नातेवाईक आप्तेष्टांनी उपचारांअभावी नानाभाऊ यांचे निधन झाल्याने संबंधित डॉक्टरवर निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस निरीक्षक चव्हाण, सपोनि संजय सहाने, जालिंदर शेळके, जामदार तांदळे, सुभाष मोटे, कुलकर्णी यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. ऐन पाडव्याच्या दिवशी लऊळ यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, विवाहित मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.तातडीची कारवाई : अधीक्षकांची धावजिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याकडे तक्रार करण्यात आली. दुपारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.एन.बी.गाडे रूग्णालयात पोहोचले आणि मयताच्या नातेवाईकांच्या भावना जाणून घेतल्या. त्यांनी तात्काळ डॉ. इमराना शेख या कंत्राटी वैद्यकीय अधिकाºयास कार्यमुक्त करून जिल्हा शल्य चिकित्सकांपुढे हजर राहण्यास सांगितले. त्यानंतर तणाव निवळला.