राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागाच्या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक मागील अनेक वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. आपल्या न्याय मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महासंघाच्या माध्यमातून अनेकवेळा सनदशीर मार्गाने आंदोलन करूनही अद्याप त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. त्यामुळे संघटनेच्यावतीने बेमुदत संप पुकारला आहे. शासनाला दिलेली मुदत संपल्याने कोणत्याही मागण्या मान्य न झाल्याने राज्यातील संतप्त झालेल्या ७२ हजार आशा स्वयंसेविका व चार हजार गटप्रवर्तकांनी स्थानिक पातळीवर तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना बेमुदत संपावर जात असल्याचे कळविले आहे. या संपात केज तालुक्यातील १९५ आशा स्वयंसेविका व दहा गटप्रवर्तक सहभागी झाले आहेत.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्या या केंद्र शासन व राज्य शासनाच्या अधिकारात आहेत. त्यामुळे त्यांनी निवेदनाद्वारे कळविलेल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचविणे एवढेच आमच्या अधिकारात आहे. याबाबत शासन स्तरावर सकारात्मक विचार होईल.
- डाॅ. विकास आठवले, तालुका आरोग्य अधिकारी, केज.
===Photopath===
150621\09511647-img-20210615-wa0029.jpg
===Caption===
बाजार समिती मधील सेडमध्ये बहुतांशी व्यापाऱ्यांचा माल दिसून येतो