परळी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन बीडचे जिल्हाधिकारी यांनी कडक लॉकडाऊन जाहीर केला. परळी शहर पोलिसांनी लॉकडाऊनच्या २४ दिवसात मोटार वाहन कायद्यांतर्गत १६०० वाहनचालकांवर कारवाई करून ४ लाख ७७ हजार रुपये दंड वसूल केला.
परळी शहरात पोलीस स्टेशन परळी शहरअंतर्गत आझाद चौक, गणपती मंदिर, शिवाजी चौक येथील नाकाबंदी दरम्यान कार्यवाहीत रस्त्यावर विनाकारण फिरणारे वाहनचालक, विनामास्क फिरणाऱ्या १६०० वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यांच्याकडून तब्बल ४ लाख ७७ हजार रुपये दंड वसूल केला. तसेच विनापरवाना उघडे असलेल्या दुकानदारांकडून नगरपालिकेने ३ लाख १२ हजार रुपये दंड वसूल केला आहे. दुकान उघडे ठेवत असल्याची माहिती मिळताच परळी शहर पोलिसांचे फिरत्या पथकातील पोलीस कर्मचारी व नगरपालिका कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. तसेच शहरातील रस्त्यावर नाकाबंदी करून विनाकारण फिरणारे व मास्क न वापरणाऱ्यांची परळी आरोग्य विभागाकडून अँटिजन चाचणी करण्यात आली.
परळी शहर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गोरक्ष पालवे, सहायक पोलीस निरीक्षक अशोक खरात, पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव, डी. बी. पथकाचे भास्कर केंद्रे, शंकर बुड्डे, गोविंद भताने, तुकाराम मुरकुटे, दत्तात्रय इंगळे, किशोर घटमल, रमेश तोटेवाड, श्रीकांत राठोड, सुंदर केंद्रे, श्रीगणेश राऊत, हरिभाऊ घुमरे, लांडगे बापू, चट्टे व वाहतूक शाखेचे प्रवीण क्षीरसागर , ज्ञानेश्वर मराडे व इतर पोलीस कर्मचारी व शिक्षक व महिला शिक्षिका व होमगार्ड व महिला होमगार्ड व परळी नगर परिषदेचे कर्मचारी आदोडे, वाघमारे, मुंडे यांनी केली आहे.
===Photopath===
240521\img-20210524-wa0343_14.jpg