शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

आई-बाबा, स्वत:साठीही अन् आमच्यासाठी मास्क वापरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या सर्वांसाठीच चिंतेचा विषय बनली आहे. आजही काही लोक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या सर्वांसाठीच चिंतेचा विषय बनली आहे. आजही काही लोक बिनधास्त विनामास्क फिरत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. तसेच सध्या कोरोनामुळे १० व १२ वीचा वर्ग वगळता सर्व शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी पुन्हा घरात बसले आहेत. हाच धागा पकडून बीडमधील काही शालेय विद्यार्थ्यांशी ‘लोकमत’ने संवाद साधला. यावर त्यांनी आम्ही तर मास्क वापरतोच; परंतु आई-बाबालाही वापरायला सांगतो, असे सांगितले. जे वापरत नाहीत, त्यांना ते भावनिक साद घालत असल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात १८ हजार ६६३ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. पैकी १७ हजार ७७० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, ५७७ जणांचा कोरोनाने जीव घेतला आहे. डिसेंबर अखेरनंतर कोरोनाची रुग्णसंख्या थोडी कमी झाली होती. परंतु आता मागील आठवड्यापासून राज्यभरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसते. यामुळेच शाळाही बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

दरम्यान, रुग्णसंख्या वाढत असली तरी आजही काही लोक नियम पायदळी तुडवून कोरोनाला निमंत्रण देत आहेत. मास्क, सोशल डिस्टन्स ठेवले जात नसल्याने कोरोना संसर्ग वाढत आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचेही पालन केले जात नाही. या संसर्गापासून बचावासाठी सर्वांनी मास्कचा नियमित वापर करून कोरोना नियम पाळणे गरजेचे आहे.

स्वत:ची काळजी घ्या आणि आई-बाबाचीही काळजी घ्या!

n प्रथम तुम्ही स्वत:ची काळजी घ्या. तसेच आई-वडील, भाऊ-बहीण, शेजाऱ्यांचीही काळजी घ्या. वडीलधाऱ्या मंडळींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसलीच तर त्यांना तातडीने दवाखान्यात घेऊन जा. त्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्ययंत्रणा सज्ज आहे.

n आई-वडिलांना कामानिमित्त बाहेर जावे लागते. बाहेर जाताना ते मास्क लावतात का? बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुतले का? सॅनिटायझर वापरले का, हेदेखील पाहा, असा सल्ला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या पत्रातून शालेय विद्यार्थ्यांना दिला आहे.

स्वत:साठी, आपल्या कुटुंबासाठी मास्क वापरावे. कोरोनाचे सर्व नियम पाळावेत. कोरोनाचा धोका अद्यापही संपलेला नाही. त्यामुळे कोणीही गाफील राहू नये. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. विनाकारण घरबाहेर पडू नये. नोकरी अथवा इतर कामासाठी घराबाहेर पडल्यावर तोंडाचा मास्क काढू नये. आपली एक चूक धोकादायक ठरू शकते.

- डॉ. आर. बी. पवार,

जिल्हा आरोग्य अधिकारी बीड

माझे आई-बाबा सुरुवातीपासूनच कोरोनाचे सर्व नियम पाळतात. मास्क नियमित वापरतात. बाहेरून आल्यानंतर सॅनिटायझर वापरतात. आम्हाला काळजी घ्यायला सांगतात. माझा भाऊ श्रेयश, श्रावणीदीदीही काळजी घेतात.

-संस्कृती महेश जोशी

कोरोनाचे नियम सर्व पाळले जातात. वडील आरोग्य विभागात नोकरीला असल्याने ते स्वत: काळजी घेतात आणि आम्हालाही सांगतात. एखाद्यावेळेस ते मास्क विसरल्यावर आम्ही त्यांना आठवण करून देतो. आम्ही काळजी घेतो.

-संतोष मनेंद्र बागलाने

लॉकडाऊनमध्ये आम्ही घराच्या बाहेर निघालो नाहीत. शाळा सुरू झाल्यानंतर गेले होते. आम्ही पूर्ण काळजी घेतो. माझी मम्मी घरीच असते. पप्पा बाहेर आणि कामाला जाताना मास्क वापरतात. कोरोनाचे सर्व नियम स्वत: पाळतात आणि मलाही सांगतात.

-समीक्षा अनिल भंडारी

आई बाहेर जायचा असेल तर हिजाब असतो त्यामुळे मास्क वापरायची गरज नाही. बाबा नियमित वापरतात. जेव्हा विसरतात, तेव्हा मी आठवण करून देते. मीदेखील मास्क वापरते. कोरोनापासून बचावासाठी आम्ही पूर्ण काळजी घेतो.

अनाबिया फातेमा शेख वाजेद

माझी मम्मी डॉक्टर आहे. पप्पा वकील आहेत. त्यामुळे आमच्या घरात कोरोनाचे सर्व नियम पाळले जातात. मम्मी ड्यूटीवरून आली की अगोदर फ्रेश होते. पप्पादेखील काळजी घेतात. मला त्रास होऊ नये म्हणून माझे मम्मी-पप्पा खूप काळजी घेतात.

दक्ष मधुकर फलके

माझे बाबा नोकरीनिमित्त बाहेर जातात. ते नियमित मास्क वापरतात. आई आणि मलाही वापरण्यास सांगतात. सध्या शाळेला सुट्टी असल्याने मी घरीच अभ्यास करतो. जेव्हा कधी आई-बाबा सोबत बाहेर जायचे असते तेव्हा आम्ही सगळे मास्कचा वापर न विसरता करतो.

पीयूष शामसुंदर देशमुख