शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन बंद; दोन नर्स निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:31 IST

बीड : रुग्णाचा ऑक्सिजन बंद होता. तो सुरू करण्याची विनंती केल्यानंतर ही आपली जबाबदारी नाही असे सांगत हात झटकणाऱ्या ...

बीड : रुग्णाचा ऑक्सिजन बंद होता. तो सुरू करण्याची विनंती केल्यानंतर ही आपली जबाबदारी नाही असे सांगत हात झटकणाऱ्या दोन नर्सवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. घटनेनंतर तत्काळ कारवाई होणे अपेक्षित असतानाही अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांनी या नर्सला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला होता. अखेर वरिष्ठांच्या सूचनेनंतर त्यांना जड अंतकरणाने या दोन नर्सला निलंबित करावे लागले.

सोनाली पवार व दीपांजली काळे असे या निलंबित केलेल्या नर्सची नावे आहेत. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास वॉर्ड क्रमांक सहामधील रुग्णाचे ऑक्सिजन बंद असल्याने त्याला त्रास सुरू झाला. नातेवाईकांनी धाव घेतल्यानंतर ऑक्सिजन लावण्याची विनंती केली होती. यावर कर्तव्यावर असलेल्या नर्सने आपली जबाबदारी झटकून हे काम वॉर्डबॉयचे असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तत्काळ हा प्रकार जिल्हाधिकारी व आरोग्य विभागातील वरिष्ठांना कळविला. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांनी वॉर्डमध्ये येऊन खात्रीही केली. यात त्यांना दोषी असल्याचे दिसले. यावेळी काही माध्यम प्रतिनिधीही सोबत होते. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी या दोन्ही नर्सला कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. परंतु डॉ.राठोड यांनी ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करीत कारवाईला दोन दिवस उशीर केला. अगोदर बदली करून त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. नंतर हा प्रकार वरिष्ठांच्या लक्षात आल्यावर त्यांचे निलंबन करण्यात आले. केवळ आर्थिक व्यवहार झालेले असल्याने आणि काही हितचिंतकांच्या दबावापाेटी डॉ. राठोड यांनी कारवाईला उशीर केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.

या दोन नर्समुळे केडरची बदनामी

जिल्हा रुग्णालयात सर्वात पुढे होऊन नर्सेस काम करीत आहेत. दिवसरात्र आपल्या कुटुंबापासून दूर राहून रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांच्याबद्दल नेहमीच अभिमान राहिलेला आहे. परंतु, अशा काही नर्सेसमुळे या केडरची नाहक बदनामी होत आहे. एवढेच नव्हे तर कारवाई टाळण्यासाठी चक्क अख्खे प्रशासन वेठीस धरण्याचा प्रयत्नही केला जातो. उपाेषण, आंदोलनाच्या धमक्या दिल्या जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

....

वॉर्ड क्रमांक ६ मधील दोन नर्सवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबचे आदेश डॉ. राठोडकडे आहेत.

-डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड.

..