शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे रोग, किडीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 00:02 IST

रबी हंगामातील पेरणी ५० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर झाली आहे. ज्वारी, गहू, रभरा पिके बहरात आली आहेत. मात्र, दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांवर विविध रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यक ता वर्तवण्यात येत आहे.

ठळक मुद्देपिकांवर फवारणी करण्याचा कृषी विभागाचा सल्ला : ज्वारी, हरभरा पिकांवर घाटी व लष्करी अळी वाढण्याची शक्यता

बीड : रबी हंगामातील पेरणी ५० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर झाली आहे. ज्वारी, गहू, रभरा पिके बहरात आली आहेत. मात्र, दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांवर विविध रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यक ता वर्तवण्यात येत आहे. यामुळे गरजेनुसार फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.खरीप हंगामाच्या शेवटी आणि रबी हंगामाच्या सुरुवातील जिल्ह्यात अतिवृष्टीचे संकट आले होते. त्यामुळे देखील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याचे संकट आले होते. याच दरम्यान मका पिकावर लष्करी अळीचे संकट आले आहे. त्याचा प्रादुर्भाव ज्वारी या पिकावर होत आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात ज्वारी हे प्रमुख पीक आहे. पशुधनला चारा आणि धान्य या दोन्ही गलजा या पिकामधून भागवल्या जातात. मात्र, या पिकावर लष्करी अळीचे संकट घोंगावत आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीक वाचवण्यासाठी फवारणी करावी लागणार आहे.मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे ज्वारी, गहू, हरभरा पिकांवरील किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेतकºयांनी पिकांचे सुक्ष्म निरिक्षण करुन योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे पिकांवरील रोगांचा-किडीचा प्रादुर्भाव कमी करता येऊ शकतो व पिकांचे होणार नुकसान टाळता येऊ शकते.शुक्रवारपर्यंत ढगाळ वातावरणहवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार शुक्रवारपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकºयांनी पिकाचे निरिक्षण व गरजेप्रमाणे फवारणी करणे आवश्यक आहे.कृषी विभागाचा सल्ला : हरभरा पिकावरील कीड नियंत्रण असे कराहरभरा हे जिल्ह्यातील डाळवर्गीय प्रथम क्रमांकाचे पीक आहे. यावर घाटी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला तर,५ टक्के लिंबुळी अर्क, १ टक्के साबण चुरा किंवा बी.टी. जीवाणू पावडर, १ ते १.५ किलो प्रति हेक्टर किंवा लिंबोळी अर्क ५ टक्के, अन्डोसल्फान ३५ ई.सी.१० मिली किंवा क्रिनॉलफॉस २५ ईस.सी २० मिली. किंवा फार्मेथिअ‍ॅन २५ ईसी २० मिली किंवा ट्रायझोपआॅ ३५ टक्के, जाल्टामेथ्रीन १ टक्के २५ मिली किंवा ट्रायझोफॉस ३५ टक्के डेल्टामध्रीन १ टक्के २५ मिली किंवा अन्डोसल्फान ३५ ईसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यानंतर पिकाचे निरक्षण करावे गरजेनुसार फवारणी करावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भावमक्यावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव ज्वारी या पिकावर देखील झाला आहे. त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी शेतकºयांनी पहिल्या टप्प्यात लिंबोळी अर्क ५ टक्के ५० मिली १० लिटर पाण्यात मिसळून प्रति. हे. फवारावे.लष्करी अळीची वाढ दुसºया व तीसºया टप्प्यात असेल तर इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के डब्ल्युअजी ४ ग्रॅम किंवा स्पिनोसॅड ४५ टक्क े एससी ३ मिली अथवा धायमिथॉक्सझाम १२.६ टक्के लॅमडा साहॅलोथ्रिन ९.५ टक्के, क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एससी ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.योग्य पद्धतीने फवारण्या झाल्यास लष्करीअळीचा प्रादुर्भाव कमी होते. अशी माहिती तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी दिली.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र