अंबाजोगाई : बहुतांश खासगी रुग्णालये मुख्य रस्त्यावर जैविक कचरा रस्त्यावर टाकत आहेत. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
सुटे नाण्यांचा तुटवडा
बीड : नोटाबंदीनंतर ग्रामीण भागात सुट्या नाण्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यावर अद्याप तोडगा निघाला नसल्याने आर्थिक व्यवहार करताना मोठ्या अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी चिल्लर मिळत नसल्याने ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत आहे.
रॅकेट सक्रिय
बीड : शहरातील प्रमुख भागातील दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. गाडी चोरीस गेल्यानंतर तक्रारी दाखल होतात. एफआयआर दाखल होते. पोलिसांना चोरांचा माग लागत नसल्याचे चित्र आहे. या वाहन चोरीला आळा घालण्याची मागणी आहे.
गुटखा, दारू विक्री
माजलगाव : टाकरवण परिसरात सध्या अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे. गुटखा बंदी असूनही गावात गुटखा विक्री सर्रास सुरू आहे तसेच अवैध दारू विक्रीही बोकाळली आहे. दारूच्या व्यसनाने अनेकांचे संसारात कलह वाढत चालले आहेत.