शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

जमावाच्या हल्ल्यात एक वर्षाचा चिमुकला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:37 IST

पाटोदा : तालुक्यातील पारनेर येथे २५ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास पारधी वस्तीवर जमावाने हल्ला ...

पाटोदा : तालुक्यातील पारनेर येथे २५ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास पारधी वस्तीवर जमावाने हल्ला केला. यावेळी साहित्याची ताेडफोड करून घरे पेटवून देण्यात आली. या हल्ल्यात एका वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पाटोदा ठाण्यात दहा ते बाराजणांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी सातजणांना ताब्यात घेतले आहे.

पारनेर गावाजवळ पारधी समाजाची वस्ती आहे. या वस्तीवरील लोक गावात तसेच शेतात चोरी करतात, असा गावकऱ्यांचा आरोप आहे. यावरून त्यांच्यात सतत वाद होत होता. दरम्यान, २५ सप्टेंबर रोजी रात्री काही तरुणांचा जमाव वस्तीवर चालून आला. लाठ्या-काठ्यासंह केलेल्या हल्ल्यात भिवराबाई काळे यांची झोपडी पेटवून दिली, त्यामुळे संसारोपयोगी साहित्य खाक झाले. यात भिवराबाई यांचा नातू मानू ऊर्फ सिद्धांत अरुण काळे (वय १) या चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर पाचजण गंभीर जखमी झाले. या हल्ल्याची माहिती मिळाल्यावर पाटोदा ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

भिवराबाई अभिमान काळे (वय ६५), अभिमान काळे (७०) ,सगुना अरुण काळे, विद्या साईनाथ भोसले व ताराबाई (पूर्ण नाव नाही), विद्या साईनाथ भोसले यांचा जखमींत समावेश आहे. यापैकी अभिमान काळे यांची प्रकृती चिंताजनक आहे. भिवराबाई अभिमान काळे यांच्या फिर्यादीवरुन पाटोदा ठाण्यात बबन औटे ,बाळू औटे, बबन औटे, विनोद औटे, अशोक दहिवले, विष्णू औटे, युवराज औटे, विशाल औटे यांच्यासह एकूण दहा ते बाराजणांवर पाटोदा ठाण्यात ॲट्रॉसिटीसह खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

....

बोकड चोरीची पार्श्वभूमी

पारनेरमधील घटनेला बोकड चोरीच्या घटनेची पार्श्वभूमी आहे. चार दिवसांपूर्वी भगवान औटे यांचे बोकड चोरीस गेले होते. पारधी समाजाच्या एका तरुणावर चोरीचा आरोप झाला होता. यातून औटे यांच्यावर तरुणाने चाकूने हल्ला केला होता. यामुळे ग्रामस्थांनी संतापाच्या भरात वस्तीवर हल्ला चढविला. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. उपअधीक्षक विजय लगारे, पोलीस निरीक्षक मनीष पाटील यांनी पारनेरमध्ये तळ ठोकला.

----

पारनेरमध्ये वस्तीवरील लोक व ग्रामस्थांत सतत वाद होतात. त्यातून हल्ल्याची घटना घडली. यात एका बालकाचा मृत्यू झाला. दहा ते बाराजणांवर गुन्हा नोंद केला असून सातजणांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुुरू आहे. गावता पुरेसा बंदोबस्त आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आहे.- आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड.

....