धारूर : सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनापासून ३० गावांमध्ये ग्रामऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून रोज ३००० मुलांचा अभ्यास वर्ग घेतला जाणार आहे. धारूर, अंबाजोगाई व केज या तीन तालुक्यांतील ३० गावांमध्ये एक महिना विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. उजणी येथे ग्रामपंचायत व ग्रामऊर्जा फाउंडेशनच्या वतीने या उपक्रमाची सुरुवात झाली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक ग्रामऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक दादासाहेब गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन मस्के यांनी केले, तर वैजनाथ इंगोले यांनी आभार मानले. यावेळी सरपंच भारत गायकवाड, उपसरपंच बापू गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य बंडू राऊत, ग्रामऊर्जाचे अशोक हातागळे, स्वयंसेवक दीपाली गायकवाड तसेच गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
३० गावांतील ३००० विद्यार्थ्यांचा महिनाभर अभ्यासवर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:49 IST