शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
2
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
3
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
4
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
5
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
6
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
7
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
8
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
9
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
10
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
11
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
12
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
13
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
14
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
15
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
16
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
17
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
18
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
19
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
20
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा

पीक कर्जाच्या परतफेडीला महिनाभराची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST

बीड : राज्यभरात पीक कर्जाची परतफेड जून अखेरपर्यंत करावी लागते. जे शेतकरी जून अखेरपर्यंत परतफेड करतात त्यांनाच व्याज माफीची ...

बीड : राज्यभरात पीक कर्जाची परतफेड जून अखेरपर्यंत करावी लागते. जे शेतकरी जून अखेरपर्यंत परतफेड करतात त्यांनाच व्याज माफीची सवलत मिळते. मात्र यावेळी कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षीच्या पीक कर्जाची परतफेड करण्यासाठी ३१ जुलैची मुदत देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे आता आणखी एक महिना बँका जुन्या खातेदारांना पीक कर्ज देऊ शकणार आहेत.

राज्यभरात शेतकऱ्यांना ० टक्के दराने कर्ज मिळावे, यासाठी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना लागू आहे. या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे आणि त्याची परतफेड ३० जूनच्या आत केली आहे अशा शेतकऱ्यांचे व्याज बँकांना सरकारमार्फत दिले जाते. परिणामी शेतकऱ्यांवर व्याजाचा बोजा पडत नाही.

मात्र यावेळी कोरोना परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे. त्यातच अनेक कारखान्यांनी अद्यापही शेतकऱ्यांना उसाचे पैसेदेखील दिलेले नाहीत. यामुळे अनेक शेतकरी अजूनही मागील वर्षीच्या पीक कर्जाचे हप्ते भरू शकलेले नाहीत. मागील कर्जाची परतफेड केली नाही, तर नवीन कर्ज तर मिळत नाहीच , त्यासोबतच ३० जूनपर्यंत कर्ज न भरल्यास शेतकऱ्याला त्यावर ६ % दराने व्याज भरावे लागते. त्यामुळे आता या कर्ज परतफेडीला आणखी एक महिन्याची मुदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.