शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पिकअप-कार अपघातात एक ठार, चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी/धानोरा(जि.बीड) : कार आणि पिकअप यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर चार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टी/धानोरा(जि.बीड) : कार आणि पिकअप यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाले. ही घटना बीड-नगर महामार्गावर बाळेवाडी शिवारात मंगळवारी (१४ सप्टेंबर) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.

डाॅ.व्यंकटेश नारायण बोराटे (वय ४२, रा.मुर्शदपूर, आष्टी) असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील बाळेवाडीनजीक उतारावर नगरकडून आष्टीकडे येणारी कार क्रमांक एम.एच.-१२, पी.टी.६३६६ आणि बीडवरून मुंबईकडे जात असलेली पिकअप क्रमांक एम.एच.०४, जे.यू.-१३६१ या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात कार चालक डाॅ. व्यंकटेश नारायण बोराटे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा गंभीर होता. यात कारचा चक्काचूर झाला. तर पिकअपमधील केसर अली अझहर अली खान (चालक), महंमद आरिफ महंमद युनूस शेख, महंमद तारीक महंमद चौधरी, हारूण नबाव सय्यद (सर्व रा.मुंबई) हे चार जण गंभीर जखमी झाले. त्यांना अहमदनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे यांच्यासह पोलीस कर्मचारी, नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. यातील पिकअप चालक केसर अली अझहर अली खान याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

150921\nitin kmble_img-20210915-wa0033_14.jpg~150921\nitin kmble_img-20210915-wa0013_14.jpg

डाॅ.व्यंकटेश नारायण बोराटे