मातकुळी येथील ४५ वर्षांपुढील एकही नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीपासून वंचित राहू नये म्हणून स्वतः सरपंच आप्पासाहेब जरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविकांनी गावात फिरून जनजागृती करून आवाहन केले होते. त्यानंतर आष्टी ग्रामीण रुग्णालयात सरपंच जरे यांच्यासह डॉ. अमित डोके, जिल्हा परिषद शिक्षक, अशोक गाडे, प्रमोद नरोटे, सोनाजी बनकर, अजिनाथ गव्हाणे, गणेश गळगटे आदींनी जातीने लक्ष देऊन लसीकरण अर्ज भरून प्रत्येक नागरिकांचे लसीकरण करून घेतले. गावात शंभर टक्के लसीकरण होण्याच्या उद्देशाने परिश्रम घेतले. प्रसंगी नागरिक तसेच वयोवृद्धांना आष्टी ग्रामीण रुग्णालयात येण्यासाठी वाहन सुविधा उपलब्ध करून दिली. लस देऊन गाव शंभर टक्के कोविड लसीकरण करून घेऊन कोरोनाचा धोका गावात होणार नाही, याची काळजी घेतली. मातकुळी गाव सर्वच वयोगटात शंभर टक्के लसीकरण करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आमचे कर्तव्यच आहे. - आप्पासाहेब जरे, सरपंच, मातकुळी
===Photopath===
190621\2040img-20210619-wa0348_14.jpg~190621\2046img_20210619_152733_2_14.jpg