मृत व्यक्ती आंधळे वस्ती केरुळ येथील असून, ते सध्या एसटी महामंडळमध्ये मुंबई येथे कार्यरत होती, अशी माहिती आहे. नेमकी ही आत्महत्या आहे की हत्या? अशी चर्चा सर्वत्र चालू आहे. रामेश्वर हे पर्यटनस्थळ संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले असून, येथील निसर्गरम्य धबधबा पाहण्यासाठी, श्री क्षेत्र रामेश्वराचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक रोज ये-जा करतात. ८ मार्च रोजी दुपारच्या सुमारास सौताडा येथील फोटो ग्राफर प्रशांत घुले, वनखात्यातील वनरक्षक भाऊसाहेब पेचे, नवनाथ उबाळे हे नेहमी प्रमाणे जंगलात गस्त घालत असताना, त्यांना धबधब्याजवळ दगडामध्ये अज्ञात मृतदेह पाहण्यास मिळाला. पाटोदा पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल तांदळे व तांबे पुढील तपास करीत आहेत.
सौताडा धबधबा येथे एकाचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:36 IST