बीड : केंद्र शासनाच्या वतीने ‘वन नेशन वन राशन’ होणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवर ‘मेरा रेशन कार्ड’ हे ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपवर एका क्लिकवर रेशन कार्डची सर्व माहिती आता मिळणार आहे.
केंद्र शासनाच्या वतीने रेशन कार्डधारकांसाठी भारतात ‘मेरा राशन’ नावाने एक मोबाइल ॲप लाँच केले आहे. या ॲपच्या माध्यमातून लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दरासह रेशन कार्डमध्ये आपली स्थिती आणि रेशन कार्डधारकांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती मिळणार आहे. हे ॲप अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी लाँच करण्यात आले आहे. लाभार्थी हे अॅप ‘गुगल पे’वरून डाऊनलोड करू शकतात. ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ या मोहिमेंतर्गत या अॅपची निर्मिती केली आहे. एखादा रेशन कार्डधारक आपलं घर बदलून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेल्यास, त्याला या मोबाइल अॅपवर जवळ असलेल्या स्वस्त धान्य दुकान कुठे आहे, याची माहिती मिळणार आहे. ‘मेरा रेशन कार्ड’ या ॲपचा वापर करणं सोपं आहे. गुगल प्ले स्टोरवर हे अॅप उपलब्ध आहे. अॅप डाऊनलोड केल्यानंतर आपल्या मोबाइल नंबरने यात स्वत:ला रजिस्टर करा. रजिस्टर झाल्यानंतर युजरकडे रेशन कार्ड नंबर मागितला जाईल. नंबर टाकल्यानंतर सबमिट केल्यानंतर अॅपवर रेशन कार्डसंबंधी संपूर्ण माहिती मिळणार आहे.
या ॲपवरच करता येणार तक्रार
महाराष्ट्र शासनाच्या ‘एईपीडीए’ या वेबसाइटवर रेशन कार्डधारकाला आपली माहिती पाहता येते, तसेच काही तक्रार किंवा माहिती पाहिजे असल्यास त्या ठिकाणी मिळत होती. आता. या ‘मेरा रेशन कार्ड ॲप’ ॲपवरूनही तक्रार करता येणार आहे.
जिल्ह्यातील लाभार्थी २०७५८८४
अंत्योदय ४०,२४९
एपीएल शेतकर ५,४२,५५९
केशरी १४,९३,०७६