शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

आता शेतकऱ्यांना महिन्याला ५० बॅगच खत मिळणार; कृषी व्यापाऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 18:24 IST

केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे व्यापाऱ्यांवर होणाऱ्या कारवाया टळणार असून, पारदर्शकता येणार आहे.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांना होता नाहक त्रास

बीड : शेतकऱ्यांना अनुदानित खत खरेदीसाठी दरमहा ५० बॅगची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे व्यापाऱ्यांवर होणाऱ्या कारवाया टळणार असून, पारदर्शकता येणार आहे.

आता एका शेतकऱ्याच्या नावे फक्त ५० बॅग खत दर महिन्याला खरेदी करता येणार आहे. म्हणजे साधारण २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत खत शेतकऱ्याला खरेदी करता येणार आहे. यापूर्वी खतांची खरेदी अमर्यादित केली जायची. शेतकरी कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावावर खत खरेदी व्हायचे. मात्र, दोनपेक्षा जास्त सदस्यांच्या नावावर शेती असायची. त्यामुळे एकाच व्यक्तीच्या नावावर मोठ्या प्रमाणात खत खरेदी केल्याचे दिसत होते. आता आधारकार्डनुसार एका शेतकऱ्याला केवळ ५० बॅग खताची खरेदी महिन्याला करता येणार आहे. त्यामुळे किती शेतकऱ्यांना किती खत विकण्यात आले, किती शेतकऱ्यांनी खत खरेदी केले, याची माहिती संकलित होण्यासही मदत होणार आहे.

व्यापाऱ्यांना होता नाहक त्रासमागील आठ महिन्यांपासून प्रत्येक जिल्ह्यातील टॉप बायर्सची यादी जारी होत होती. दर महिन्याला जादा खत विक्री केल्याचे पोर्टलवर दिसत असल्याने कृषी विक्रेत्यांवर कारवाया होत होत्या. त्यामुळे ॲग्रो इनपुट डिलर्स असोसिएशनने हा प्रश्न केंद्र सरकारकडे लावून धरला. खत विक्री प्रणालीत (पीआएस मशीनमध्येच) लॉक सिस्टिम लागू करावी, प्रति शेतकरी खत मर्यादा निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली होती. ऑल इंडिया ॲग्रो इनपुट डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनमोहन कलंत्री, महासचिव प्रवीणभाई पटेल, कोषाध्यक्ष आबासाहेब भोकरे, प्रवक्ता संजय रघुवंशी यांनी सतत पाठपुरावा केला. त्यावर विचार करून केंद्र शासनाने हा निर्णय घेतला आहे. रसायन व उर्वरक मंत्रालयाचे डीबीटी संचालक निरंजन लाल यांनी याबाबत २१ जानेवारीला कृषी यंत्रणेला पत्राद्वारे सूचित केले आहे.

पारदर्शकता येणारया निर्णयामुळे खतांची खरेदी - विक्री ऑन रेकॉर्डवर दिसणार आहे. त्याचबरोबर खत खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याचा अंगठा पॉस मशीनवर लावून विक्री होणार असल्याने पारदर्शकता येणार आहे. तसेच व्यापाऱ्यांवरील कारवाई टळणार आहे.

दृष्टीक्षेपात : - २ लाख टन खतांची बीड जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात विक्री होते.- २० कृषी व्यापाऱ्यांना दरमहा कारवाईला सामोरे जावे लागत होते.- ५० बॅग महिन्याला अनुदानित खत खरेदी निश्चित केल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार, तर किती शेतकऱ्यांनी किती खत खरेदी केले, हे स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीBeedबीडFarmerशेतकरी